जिल्ह्यात भक्तीभावाचे वातावरण.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 20 सप्टेंबर 2023
संबंध जिल्ह्यात ढोल ताशाच्या गजरात, धुमधडाक्यात, फटाक्यांची आतषबाजी, डिझेच्या धुनवर नृत्य सादर करतांना विघ्नहर्त्या गणरायांचे आगमन झाले आहे.
सर्व श्रींच्या भावीक भक्तांमध्ये वेगळा आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. बाप्पाच्या आगमनाने हर्षोल्लासात अकरा दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
विद्यार्थीच्या शालेय स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्पर्धा परीक्षा असे अनेक कार्यक्रम काही मंडळाने आयोजित केले आहेत. लहानांपासून ते वृद्धापर्यंत, महिला भगिनी अकरा दिवस गणरायांची मनोभावे आरती पूजा, अर्चना करुन या उत्सवात सहभागी होत असतात.
यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडला. यापुढेही चांगला पडुन शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी समृद्धीचे दिवस येवोत. हिच जणु मागणी विघ्नहर्त्या गणरायाला भाविक भक्त करीत आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी अनेक मंडळांनी वेशभुषा परिधान करून ढोल वाजवत, सर्वानीच डिझेच्या तालावर ताल धरत बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात केले आहे.
????आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घरी केली “श्री” प्रतिष्ठापना
हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी गणपतीची प्रतिष्ठापना करून, आरती, पुजा- अर्चना करुन विधानसभा मतदारसंघात भाविकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.