Home Breaking News कृषि विभागाच्या वतीने शेतीशाळा संपन्न.

कृषि विभागाच्या वतीने शेतीशाळा संपन्न.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 19 सप्टेंबर 2023

हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व साखळी विकास योजनेअंतर्गत निविष्ठा वाटप करण्यात आले. व शेतीशाळा मार्गदर्शन कार्यक्रमाला मा. तहसीलदार आदित्य शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोयाबिन लागवड तंत्रज्ञान व किड व्यवस्थापण विषयी मार्गदर्शन करण्यासाठी के. व्ही. के. पोखर्णी नांदेड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शशीकांत देशमुख सर उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मा. शेंडे साहेब यांनी शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्याचे आवाहन केले. तसेच शेतीशी निगडित व्यवसाय करुन आर्थिक दृष्टीने स्वावलंबी व्हावे असेही ते म्हणाले. आपल्या मनोगतात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांची उदाहरणे दिली. डॉ. देशमुख यांनी खत व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण या विषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषि विभागाच्या विविध योजनेची माहिती तालुका कृषी अधिकारी चन्ना साहेब यांनी दिली. तांत्रिक कृषि अधिकारी एम.एस. काळे यांनी प्रास्ताविक केले शेतीशाळला उपस्थित कृषि पर्यवेक्षक एन.आर. वानखेडे, माने एस.ए. कृ.स., लोसरवार कृ.स., श्रीमती बेहेरे मॅडम, अक्कलवाड पाटील, संरपंच, ग्रामसेवक व शेतकरी उपस्थित होते.
शेतीनिष्ठ शेतकरी प्रा. ढगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना फार्मर प्रोडयुसर कंपनी तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन केले. टेंभुर्णी गावचे कृषि सहाय्यक माने यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून महसुल, ग्रामविकास व कृषि विभागाची सांगड घालत कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन प्रकल्पातील शेतीशाळेला निविष्ठा वाटप व कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तहसीलदार यांच्या हस्ते लाभार्थी कमलबाई मारोतराव तवर-देवसरकर यांना ट्रॅक्टरची चावी देऊन गौरविण्यात आले.

Previous articleक्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात सूर्यपुत्र भय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न
Next article” विघ्नहर्ता मनोभावे गणरायांची प्रतिष्ठापना!