Home Breaking News क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात सूर्यपुत्र भय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा...

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात सूर्यपुत्र भय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न

(देगांव / १७ सप्टेंबर ) _ स्थानिक अकोला जिल्हयातील देगांव येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात सूर्यपुत्र भय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा ४६वा स्मृतीदिन कार्यक्रम दिनांक १७ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रदिप निरंजन तायडे होते. त्यांचे हस्ते सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या दिव्य प्रतिमेस हारार्पण करण्यांत आले.

दिपप्रज्वलन करून पुष्प वाहून अभिवादन करण्यांत आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रदिप तायडे यांचे गुलाबपुष्प देवून श्रीधर रेवास्कर यांनी स्वागत केले. याप्रसंगी स्मृतीदिनानिमीत्त सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकरांना दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून सर्वांनी एकसाथ भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. यावेळी परिसरातील प्रतिष्ठीत मंडळी , भगीनी , लहान मुलें प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक शिरसाट यांनी केले. या प्रसंगी इंदुबाई इंगळे , आशाबाई तायडे , नलिनी अंभोरे , श्रीधर रेवास्कर, देवानंद इंगळे, गजानन नाटकर आदिंची सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर समयोचित भाषणे झालीत. विदीशा प्रदिप तायडे हिने सुरेल गीत याप्रसंगी सादर केले. या प्रसंगी वाचनालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यांत आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदिप तायडे तसेच उपस्थित सर्व बंधु – भगीनी यांनी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक शिरसाट यांचा पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार केला व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांच्या एकंदर जीवनप्रवासाच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यासपूर्ण विचार मांडलेत.

सदाशिव तायडे , धर्मेंन्द्र इंगळे , राजेश इंगळे , संदिप इंगळे , क्षीरसागर अंभोरे , वल्लभी अंभोरे आदि मंडळी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राची तायडे हिने केले, तर आभार प्रदर्शन विश्वनाथ इंगळे यांनी केले.

Previous articleधनगर समाजासाठी ‘इतर मा गास बहुजन कल्याण विभागा ‘ची गृह योजना
Next articleकृषि विभागाच्या वतीने शेतीशाळा संपन्न.