हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या व्यंक्तीसाठी वैयक्तिक घरकुल बांधणे योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागा मा र्फ़त सुरु करण्यात आली आहे.2023-24 या आर्थिक वर्षात या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी संबंधीत गावाच्या ग्रामपंचयतीशी संपर्क साधुन अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा 6 सप्टेंबर 2019 रोजीचा शासन निर्णय या योजने साठी निर्गमित झाला आहे. या योजने लाभासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. त्यांचे कुटुंब हे भज क या मुळ प्रवर्गा तील तसेच गावोंगावी जावून उपजिविका करणारे असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1लाख 20 हजार पेक्षा कमी असावे. कुटुंबाचे स्वता चा मालकीचे घर नसावे. लाभार्थी बेघर अथवा झोपडी /कच्चे घर /पाला मध्ये रहणारे असावा.