Home Breaking News अँपे आँटोला अज्ञात वाहनाने दिली धडक

अँपे आँटोला अज्ञात वाहनाने दिली धडक

*खामगाव प्रतिनिधी उमेश मोरखडे*:- अंत्रज कडून खामगाव कडे भाजीपाला घेऊन येणाऱ्या अँपे ऑटोला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून या घटनेत एक जन ठार तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे . याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी भारसाकडे यांच्या ऑटो मध्ये अंत्रज येथील निलेश बगाडे, अनिल बगाडे व पुरुषोत्तम बगाडे ह्या तीन भावंडांसह गावातीलच आणखी एक जण आपल्या शेतातील भाजीपाला खामगाव येथील बाजारपेठेत आणत होते. दरम्यान खामगाव चिखली मार्गावरील अंत्रज फाट्याजवळ असलेल्या सिंधी नाल्याजवळ एका वाहनाने मागून धडक दिली. यामध्ये अनिल बगाडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे .अपघातातील इतर जखमीना अकोला रेफर करण्यात आले असून वृत्तलेपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती…

Previous articleरिधोरा गावा मध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Next articleधनगर समाजासाठी ‘इतर मा गास बहुजन कल्याण विभागा ‘ची गृह योजना