अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा
शेगाव येथील रेणुका नगर मध्ये बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये बहुउद्देशीय महिला मंडळ तर्फे पिंपळाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.
उपस्थित रेणुका नगर येथील सर्व बहुउद्देशीय महिला मंडळ. तसेच महिला मंडळाचे. अध्यक्ष सौ प्रमिलाताई भीमराव बोदडे, उषाताई भोजने, सौ पूजा प्रवीण बोदडे, अशा सर्व महिला मंडळाच्या सदस्या तसेच आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संघटनेच्या विदर्भ पर्यावरण सचिव शितल शेगोकार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पूजाताई खेते मार्गदर्शक मीनाताई भक्त, प्रज्ञाताई सावंत मुक्ताताई ठाकूर, कल्पनाताई ठाकूर, नीता पाटील, दीपमाला कांबळे, मंगलाताई सोळंके, सर्व पर्यावरण संस्थेच्या पदाधिकारी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थिति होत्या.
तसेच नगरमधील कार्यकर्ता विकी भोजने. यांनी सुद्धा कार्यक्रमांमध्ये परिश्रम घेतले. वृक्षारोपण कार्यक्रमात महिलांना सांगण्यात आले की “झाडे लावा झाडे जगवा” किंवा झाड नका लावु किमान कुठे दिसलं तर ते नक्कीच योग्य ठिकाणी लावून जगवा.
कोरोना काळामध्ये झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बऱ्याच लोकांना आपल्या जीवाला गमवावे लागले. म्हणून येणाऱ्या आपल्या पिढीला सुद्धा आपण ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येकाने एक झाड तरी लावून त्याचे आपल्या पोटच्या बाळाप्रमाणे संगोपन करावे.
असे प्रतिपादन विदर्भ पर्यावरण सचिव. शितल शेगोकार यांनी सांगितले. विभाग जनजागृती करून एक एक मुलगी एक झाड हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. सर्वांनी या उपक्रमास सहकार्य करावे अशी त्यांनी समाजाला कडकडीत विनंती केली आहे.