संदिप देवचे
ग्रामिण प्रतिनिधी. …
..आज दि १२/०९/२०२३ रोजी ओबीसी समाजात असणार्या सर्व जातीप्रमुख पद अधिकारी यांच्या नेत्रुत्वात खामंगाव येथे मोर्चा काढण्यात आला होता.विवीध मागण्या मंध्ये प्रमुख मागण्या.
मराठा समाजाला ओबीसी मंध्ये समाविष्ट न करता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे जेणे करुन ओबीसी बांधवांवर अंन्याय होवु नये.व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येउ नये..
सकाळी ११-०० वाजता सकल ओबीसी समाजातील बांधव भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करुन व पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली.मोर्चा अतिशय शांतीपुर्वक व ओबीसी समर्थनात घोषणादेत मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या कार्यलयपरिसरात धडकला.
मोर्चा मंध्ये आलेल्या सर्व ओबीसी समाजातील प्रत्येक जातीसमुदयाच्या प्रतिनिधीने आपले मनोगत व्यक्त केले व ओबीसी समाज नेहमीचं मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या भूमिकेत आहे पण मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे जातप्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाजातील संख्याने मोठा असलेला कुणबी समाज यांच्यावर खुप मोठा अंन्याय होईल व हा अंन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही.
५२% असलेल्या ओबीसी समाजाला ५% आरक्षण वाढवून द्यावे,ओबीसी समाजाची जातीय जनगनना करण्यात यावी,ओबीसी समाजला मंजूर झालेले ७२ वसतिगृह त्वरीत सुरु करण्यात यावे.
ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजना त्वरित लागु करण्यात याव्या.जातीनिहाय जनगना करण्याची शिफारस राज्यसरकारने केन्द्र सरकारकडे त्वरित करावी.अश्या वेगवेगळ्या प्रमुख मागण्या ओबीसी समाजाने केल्या आहे.
शासनाने ओबीसी समाजाच्या मागण्यांची पुर्तता त्वरित कराव्यात अंन्यथा ओबीसी समाज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने आदोलन करतील या प्रकारचे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांना देण्यात आले.
राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अनिल अमलकार सर व राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे शहर प्रमुख सुरजभाऊ बेलोकार व ओबीसी समाजाचे पद अधिकारी यांनी मोर्चा शांततेत यशस्वीरीत्या पार पाडल्या बंद्दल त्यांचे सर्व ओबीसी समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले..