हिमायतनगर ग्रामीण तालुका प्रतिनिधी/ माधव काईतवाड बोरगडीकर
सुप्रीम कोर्टाने मराठा हे मागास नाहीत अश्या आशयाचा निकाल दिल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधे समावेश करण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी, विजे, एन टी,एसबीसी,
अलुतेदार बलुतेदार विविध जात संघटनेने केली आहे. अशा आशयाचे निवेदन ही हिमायतनगर चे तहसीलदार आदित्य शेंडे यांना देण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि सध्या चालू असलेल्या मराठा समाज आरक्षण संदर्भात मराठा समाजास ओबीसी मधे समावेश करू नये यासाठी ओबीसी समाज एकवटला असून यासाठी विविध स्तरावरून मागण्या करणे सुरु केले आहे. यातच मराठा समाजाला ओबीसी मधे समावेश करू नये व ओबीसीच्या इतर अनेक मागण्यासाठी हिमायतनगर चे तहसीलदार आदित्य शेंडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात मराठा समाज हा मागास नाही या आशयाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मान ठेवावा व मराठा समाजास ओबीसीमध्ये समावेश करू नये. राज्य सरकारने घोषित केलेली जिल्ह्याभरातील 72 वस्तीग्रह सात हजार दोनशे एसबीसी, एन टीबी,ओबीसी विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा.वित्त आयोगाने थांबून ठेवली फाईल ही सुरळीत करण्यात यावी. एकवीस हजार सहाशे ओबीसी,वी जे एन टी,एस बी सी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेच्या धर्तीवर योजना सुरु करण्यात यावी.वर्ष परदेशी शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात यावी. अशा मागण्या या नियोजनातून करण्यात आले आहे तसेच जर हे झाले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभे होईल आणि ओबीसीचा आक्रोश सरकारला महाग पडेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संजय काईतवाड,मारोती अकलवाड, बाबाराव जरगेवाड, शिवा यटमवाठ, अभिषेक बकेवाड, आनंद घोसलवाड,अभिलाश जैस्वाल,शूभम काईतवाड,टिकाराम कदम एकंबेकर, योगेश पिस्केवार, ज्ञानेश्वर कोलकंडवार यांच्यासह आदिजन उपस्थित होते.