Home Breaking News अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!

अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला : अकोला शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर खोचक भाष्य करणारे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. गेले काही वर्ष स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

त्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी सभागृहात लोकप्रतिनिधी नाहीत. भाजप – शिंदे सेनेचे सरकार प्रशासकाच्या माध्यमातून कारभार हाकत आहे. जनतेचे अनेक प्रश्न असेच प्रलंबित आहेत. त्यातच अकोल्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक बेहाल आहेत.

अकोला शहरातील खराब रस्त्यांचे फोटो ट्विट करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, “आश्चर्यचकित होऊ नका. हा चांद्रयान ३ द्वारे काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो नसून अकोल्यातील रस्त्यांचा फोटो आहे. आता अकोल्यात चंद्र आणण्यासाठी कोण जबाबदार आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे!” असे खोचक भाष्य केले आहे.

Previous articleकावड वाहून नेणाऱ्या शिवभक्तांवर काळाचा घाला, टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
Next articleकारला(पि.)येथील महिलांची दारु बंदी साठी थेट पोलीस स्टेशन ला धाव……