Home Breaking News सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

खामगाव : सकल मराठा समाज चे वतीने जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणा करिता आंदोलन करीत असलेल्या मराठा समाज आंदोलकावर लाठी चार्ज केलेल्या घटनेचा निषेध करण्या करीता आज दिनांक 8 सप्टेंबर सकाळी 11 वाजे पासुन ते 11 सप्टेंबर दुपारी 2 पर्यंत उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालया समोर टावर चौक येथे ठीया आंदोलन करुन निवेदन सादर करणार आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथिल मराठा समाज बांधवांचे आरक्षणाकरिता न्यायिक मार्गाने सुरु असलेले आंदोलन चिरडून काढण्या करिता दडपशाही चा वापर करीत आंदोलकावर अमानुषपणे गैर कायदेशीर रित्या केलेल्या लाठीचार हल्ल्याच्या निषेधार्थ व मराठा समाज आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्याकरिता खामगांव येथिल उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर टावर चौक येथे दिनांक 8 सप्टेंबर सकाळी 11 वाजता ठीया आंदोलन सुरु करण्यात आले असून सकल मराठा समजाच्या वतीने निषेध नोंदविण्याज आला. या ठिय्या आंदेालनात मराठा समाज आरक्षणाची मागणी पुर्ण करुण घेण्या करिता सर्वात शेवटी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. यावेळी खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधव, विविध सामाजिक संघटनेचे , राजकीय पक्षाचे पदाधिकारी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleशेगाव येथील भिमनगर नागरिक रमाई आवास घरकुल योजनेपासुन वंचित, परिवार यांचा टाहो.
Next articleजालना येथील घटनेच्या निषेधार्थ वाडेगाव बंद