Home Breaking News शेगाव येथील भिमनगर नागरिक रमाई आवास घरकुल योजनेपासुन वंचित, परिवार यांचा टाहो.

शेगाव येथील भिमनगर नागरिक रमाई आवास घरकुल योजनेपासुन वंचित, परिवार यांचा टाहो.

अँकर शितल शेगावकर प्रतिनिधी भूमीराजा

भीम नगर परिसरातील गीताबाई सुभाष शेगोकार यांचे घर काल दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूर्णपणे जमीन दोस्त झाले. त्यांच्यावर आता उघड्यावर राहायची वेळ आली आहे. शासनाला त्यांनी कडकडून विनंती केली आहे की. आम्ही आता कुठे राहावं कसे राहावे? लहान लहान चिमुकल्यांना घेऊन पावसात आता आम्हाला कोणी घर देईल का? राहायला घर देईल का असे म्हणत चिमुकले सुद्धा शासनाला विनंती करत आहेत.
शेगाव येथील  भिमनगर .जिल्हा बुलढाणा परिसरामधील गिताबाई सुभाष शेगोकार दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे यांचे घर जमीन दोस्त झाले चिमुकल्यासह त्यांनी राहायला कुठे जावं? आणि पावसाळ्यात कोणी घरी कोणाच्या राहू देत नाही. छोटे चिमुकले घर द्या आम्हाला घर द्या असे म्हणत शासनाला विनंती करत आहेत.
अजूनही त्यांना रमाई आवास योजना घरकुलाचा लाभ मिळाला नाही तरी शासनाने लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय द्यावे आणि रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाला घर मिळावे असे त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले आहे.

Previous articleघरात चिमुकलीचा मृत्यू, आईने खोटे अश्रू ढाळले; पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सर्वच हादरले!
Next articleसकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन