Home Breaking News ग्रामीण भागातील ऐन रात्रीच्या जेवणाच्या वेळची अघोषीत लोडशेडींग तात्काळ रद्द करा…सरपंच व...

ग्रामीण भागातील ऐन रात्रीच्या जेवणाच्या वेळची अघोषीत लोडशेडींग तात्काळ रद्द करा…सरपंच व समस्त सिरंजनी ग्रामस्त*

ग्रामीण भागातील अघोषीत लोडशेडींग तात्काळ बंद न केल्यास एक महिन्याच्या बिलावर बहिष्कार टाकु व ग्रामसभेत बिल न भरण्याचे ठराव पास करणार …समस्त ग्रामस्त

भुमिराजा ग्रामीण ता. प्रतिनिधी/माधव काईतवाड बोरगडीकर

हिमायतनगर:- तालुक्यातील महावितरण चा मनमानी कारभार समोर आला आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात लाईट चा लपंडाव सुरू आहे हा लपंडाव शेतकरी कष्टकरी जणता दिवसभर शेतात काम करुन येतात ऐन रात्रीच्या जेवणाच्या वेळी ७ते ९ च्या दरम्यान अघोषित लोडशेडींग होत आहे.हि अघोषित लोडशेडींग तात्काळ बंद करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सरपंच पवन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिरंजनी ग्रामस्तानी केली आहे.देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ली ग्रामीण भागात लाईट चा खुप मोठ्या प्रमाणात लपंडाव सुरु आहे. तसेच load management च्या नावाखाली रोज रात्री ७ ते ९ या वेळेत लोड शेडींग घेण्यात येत आहे. अन्न वस्त्र निवारा या बरोबरच सध्या लाईट पण मनुष्य जीवनातील मुलभूत गरज झालेली आहे. मात्र नागरिकांना रात्रीला आवश्यक असलेल्या वीजपुरवठा देण्यास महावितरण कंपनीचे अधिकारी चालढकल करत आहेत हे दररोज सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगमुळे दिसते आहे.ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी बांधव दिवसभर शेतात काम करून थकून भागून घरी येत असतो. मात्र घरी आल्यावर स्वयंपाक व जेवणाच्या वेळी लाईट नसल्यामुळे सामान्य नागरिक अगदी मेटाकुटीला आलेला आहे. या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही काहीच फायदा होत नसल्याने विजगृहकांचा महावितरण कंपनीवर असलेला विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आता सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी खाजगी कंपन्यांना उच्च प्रतीच्या वीजपुरवठा देण्यासाठी पाचारण करण्यात यावे असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटलं आहे.आम्ही ग्रामीण भागात राहणारे सुद्धा हाडामासाचे जिवंत मानव आहोत. या गोष्टीचे भान ठेवून आम्हाला सुरळीत विद्युत पुरवठा द्यावा व लोड शेडींग तत्काळ रद्द करावी. अन्यथा आम्ही ग्रामीण भागातील नागरिक एक महिन्याचे बिलावर बहिष्कार टाकू व बिल न भरण्याचा ठराव पास करून असहकार आंदोलन करू याची नोंद घ्यावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनावर पवन करेवाड, शिवराम दोतुलवाड, मारोती सगमवाड, व्यंकट राहुलवाड, मोहन सिल्लेवाड, दिगंबर पिटलेवाड, गोविंद जंगीलवाड, ओमकार राहुलवाड सह तालुक्यातील एकंबा, कोठा, सिरंजनी येथील सरपंच व ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Previous articleपिढ्यांन पिढयांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा उजेड पेरणाऱ्या शिक्षकांचे महान कार्य….डॉ. अशोक शिरसाट
Next articleघरात चिमुकलीचा मृत्यू, आईने खोटे अश्रू ढाळले; पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सर्वच हादरले!