जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 03 सप्टेंबर 2023
न्याय डोंगरी येथील जाधववस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती विद्या सुदेवाड यांना आपली आपुलकी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षिका श्रीमती विद्या सुदेवाड यांना आपली आपुलकी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे आज 3 सप्टेंबर रोजी नासिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सोहळ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीमती शर्मिला वालवलकर, लातुर येथील सहायक परिवहन अधिकारी विजय भोये, पुणे येथील पिव्हीजी एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे सहसचिव अजय सोनवणे, रिमांड होमचे उपाध्यक्ष डी. आर पाटील, स्वामी परिपुर्णानंद महाराज आदी या सोहळ्याला उपस्थित होते.
श्रीमती विद्या सुदेवाड यांचे हदगांव-हिमायतनगरचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, संरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक श्रीराम सुदेवाड, अमोल सुदेवाड भाऊ, व मंगरुळ येथील सर्व गावकरी बांधव, भगिनींनी श्रीमती विद्या सुदेवाड यांचे अभिनंदन केले आहे.