Home Breaking News प्रा. डॉ. संघर्ष सावळे यांची संमेलन अध्यक्ष म्हणुन निवड.

प्रा. डॉ. संघर्ष सावळे यांची संमेलन अध्यक्ष म्हणुन निवड.

शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

दि. २ सप्टेंबर २०२३
सुशिला वाकडे बहुउद्देशिय संस्था निकतवाडा, सुशिला काव्य विचार साहित्य मंच आयोजीत पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा चंद्रपूर (वरोरा) येथे येत्या दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी संस्थापिका मा. प्रियंका शेंडे यांनी आयोजीत केले आहे. तसेच प्रकाशन सोहळा चे स्वागत अध्यक्षा श्रीमती शोभा वेले (गडचिरोली) ह्या आहेत.

डॉ. संघर्ष सावळे हे आंतरराष्ट्रिय कवी सम्मेलन दुबई येथे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी कवी संमेलनात ते प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहिले.
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यांचे विविध लेख,पुस्तक,प्रबंध प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांना विविध राष्ट्रिय व आंतर राष्ट्रिय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा त्यांच्या हस्ते संपूर्ण महाराष्ट्रातील पुरस्कार्थिना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या नंतर कवी संमेलन आयोजीत केले आहे. तरी सर्वांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Previous articleमराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने खामगाव उपविभागीय कार्यालयात निवेदन
Next articleश्रीमती विद्या सुदेवाड यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान.