संदिप देवचे जलंब ग्रामीण प्रतिनिधी
जलंब येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रा च्या कर्मच्यारांचा मनमानी कारोभार व रूग्णांन च्या होणार्या गैरसोई यावर आळा बसावा म्हणुन जलंब गावचे सरपंच दुर्गाताई गव्हांदे व आरोग्य केन्द्राअंतर्गत येणार्या 10 गावातील सरपंचानी एकत्र येउन 29 आगस्ट रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आंदोलनाचा ईशारा दिला होता त्या करीता आज 1 सप्टेंबर पासुन धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी जलंब गावचे सरपंच दुर्गाताई गव्हांदे उपसरपंच महेश गव्हांदे पं.स.सदस्य विठ्ठल सोनटक्के माजी सरपंच दिलीप शेजोळे संजय गव्हांदे प्रकाश देवचे सुरेश गव्हांदे देविदास साबळे गोपाल मोहे गिरधर फाटे पंकज मंडवाले संजय अवचार गजानन असंबे माणिक दोरकर बबलु देशमुख नितिन वाकोडे विकास देवचे महादेव तायडे सागर गाडकर व महीला मंडळी सह गावातील खुप नागरीक हजर होते..