Home Breaking News * महाराष्ट्रात कॉंग्रेस चा हटवाद भाजपच्या पथ्यावर पडेल…!!

* महाराष्ट्रात कॉंग्रेस चा हटवाद भाजपच्या पथ्यावर पडेल…!!

कार्यालयीन प्रतिनिधी

मा. भोजने सर यांनी तंतोतंत प्रसंगावकाश मांडलेले राजकिय गणित …..

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी INDIA नावाची आघाडी बनवून मिडिया मार्फत हवा तयार करायला सुरुवात केली आहे, विरोधकांची मोट बांधण्यासाठी खरतरं नितिश कुमार यांनी पुढाकार घेतला मात्र ऊच्च वर्णियांचा मनुवादी कॉंग्रेस पक्ष कर्नाटक निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊन देशपातळीवर कॉंग्रेस पक्ष भाजपला पराभूत करु शकतो या अविवेकी भुमिकेत वावरतांना दिसतो आहे…!!
नितीश कुमार सारख्या ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारून ऊच्च वर्णियांच्या सत्तेचा खेळ सुरू झाला आहे, कॉंग्रेस पक्षातील जयराम रमेश, आणि इतरही एसी तील नेते आता सक्रिय झाले आहेत…!!
ऊच्च वर्णियांच्या मिडिया मार्फत संसदेतील ५४५ पैकी केवळ ४० खासदार असलेल्या कॉंग्रेस पक्षाची वकीली करुन,राहुल गांधी यांचे महिमामंडन करुन देशात पुन्हा कॉंग्रेस ची सत्ता येणार अशी आवई ठोकली जात आहे…!!
केंद्रातील भाजपच्या सरकारला २०२४ मध्ये पराभूत करायचे असेल तर विरोधी पक्षांसाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन राज्य अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण भाजपच्या ३०३ खासदारांमध्ये उत्तर प्रदेश मधून ६२ आणि महाराष्ट्रातील ४१ असे दोन राज्यातील मिळून १०३ खासदार आहेत. हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे या दोन राज्यात भाजपला रोखता आले तर केंद्रातून भाजपला हटविता येते…!!
महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची ताकद किती आहे आणि कॉंग्रेस पक्ष भाजपला रोखू शकतो काय.?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा १च खासदार निवडून आलेला आहे आणि कॉंग्रेस पक्षाला १६% मते मिळाली आहेत, महाराष्ट्रातील ही १६% मते कुणाची तर अल्पसंख्याक मुस्लिम समुहाची आहेत हे वास्तव आहे,त्या बळावर कॉंग्रेस भाजपला पराभूत करू शकते का.? उत्तर आहे नाही.
कॉंग्रेस पक्षाचे नेते मात्र मराठा समाजाचे आणि कॉंग्रेस पक्षाची मते मात्र अल्पसंख्याक समुहाची ही खरी मेख आहे, मराठा समुहाची मते ही धर्मांच्या नावाखाली सरळ सरळ भाजपकडे आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे…!!
महाराष्ट्रात मविआ आघाडी असा बागुलबुवा ऊभा केला आहे, मविआ आघाडी तयार झाली तेव्हा शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांची आघाडी होती मात्र आज ती आघाडी कायम नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५४ पैकी ४०आमदार भाजप सोबतं गेले. शिवसेनेचे ४० आमदार भाजप सोबतं गेले त्यामुळे मविआ आघाडी खिळखिळी झालेली आहे म्हणून मविआ च्या नावाखाली भाजपला पराभूत करता येईल का.? उत्तर आहे नाही.
जेव्हा जेव्हा कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रात आंबेडकरी मतदारांनी सावरले हा इतिहास आहे…!!
१९९२ साली बाबरी मशीद पाडल्या नंतर देशात भगवी लाट तयार झाली त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या त्यावेळी कॉंग्रेस पक्षाला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले होते.
१९९८ साली लोकसभेच्या पुन्हा निवडणूका झाल्या त्यावेळी आंबेडकरी मतांची ताकद असलेल्या एकीकृत रिपब्लिकन पक्षाची कॉंग्रेस सोबतं युती झाली तेव्हा रिपब्लिकन पक्षाचे ४ आणि कॉंग्रेस पक्षाचे ३३ खासदार निवडून आले होते भगवी लाट संपवण्याची मोठी जबाबदारी बोद्ध मतदारांनी बजावली होती हा महाराष्ट्राचा इतिहास आहे…!!
कॉंग्रेस पक्षाकडे १९९६ साली १५ खासदार होते १९९८ ला आंबेडकरी मतदारांनी कॉंग्रेसला वाचविले १५ चे ३३खासदार केले होते.आजरोजी १ च खासदार आहे, तरीही तुम्हाला आंबेडकरी मतांची ताकद असलेल्या पक्षाची गरज वाटतं नसेल तर कॉंग्रेस पक्षाचा हा हटवाद भाजपच्या पथ्यावर पडणार आहे असेच दिसते…!!
१९९५च्या भगव्या लाटेत महाराष्ट्रात शिवसेना भाजपचे युती सरकार सत्तेवर आले होते, त्यानंतर १९९९ च्या निवडणूकीत कॉंग्रेस, भारिप बहुजन महासंघाची युती झाली आणि भाजप शिवसेनेला हटवून कॉंग्रेस पक्षाचे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार सत्तेत आले होते, आंबेडकरी मतांच्या भरवशावर राज्यात आणि केंद्रात सत्तेत जाण्याचा अनुभव असुनही कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रातील आंबेडकरी मतांची गरज वाटतं नसेल तर हा कॉंग्रेस पक्षाचा हटवाद भाजपला मदतच करेल असे दिसते आहे…!!
सरंजामी वृत्तीच्या कॉंग्रेस नेतृत्वा जवळ आपल्या स्वतःच्या समाजाची मते नाहीत , कॉंग्रेस पक्षाकडे जी मते आहेत ती भयग्रस्त अल्पसंख्याक समुहाची, ओबीसी, आणि ऊच्च वर्णिय मते धर्माच्या नावाखाली भाजपसोबत आहेत, मग कॉंग्रेस पक्ष भाजपला पराभूत करणार कसा.?
कॉंग्रेस पक्षाच्या सत्तर वर्षाच्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा डोळ्यासमोर घ्या हेच लक्षात येईल की, आंबेडकरी मतांसाठी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचार वाहनावर निळा झेंडा लावलेला असतो, कॉंग्रेस पक्षाला आंबेडकरी समुहाची मते हवी आहेत मात्र आंबेडकरी विचारांचा राजकीय पक्ष नको आहे…!!
अशावेळी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात आंबेडकरी समुहाच्या मतांची प्रताळणा करीत असेल तर कॉंग्रेस पक्ष एकप्रकारे भाजपला मदतच करीत आहे आणि ही बाब अतिशय धोकादायक आहे हे महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे…!!
INDIA नांव धारण केले म्हणजे भाजपला हरविले असे जादुची कांडी फिरविल्या सारखे होतं नाही तर भाजपला पराभूत करण्यासाठी मतांची गरज आहे आणि महाराष्ट्रात ती मतांची ताकद आंबेडकरी समुहाकडे आहे हे कॉंग्रेस पक्षाला ऊमजले तर ठिक आहे नाहीतर कॉंग्रेस पक्षाच्या हटखोर वृत्तीमुळे पुन्हा भाजपला संधी मिळेल असे दिसते आहे…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.:-9960241375

Previous articleलग्नासाठी मुलगी मिळत नाही; संपत्तीत हिस्सा द्या, मुलांची मागणी, वडिलांनी दिला नकार, अन्…
Next articleजलंब प्राथमिक आरोग्य केंन्द्रासमोर विविध मागण्या साठी धरणे आंदोलन