Home Breaking News “त्या” गावातील विद्युत पथदिवे महिन्यापासून बंद,रात्रीला असतो रस्त्यावर अंधाराचा काळोख…

“त्या” गावातील विद्युत पथदिवे महिन्यापासून बंद,रात्रीला असतो रस्त्यावर अंधाराचा काळोख…

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

संभापूर :- गावात रस्त्यावर असलेल्या पोलावरील पथदिवे महिन्यांपासून पासून बंद अवस्थेत दिसत आहेत.
पथदिवे बंद असल्याने या रस्त्यावर ये जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळीस नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. गावातील प्रत्येक मोहल्ल्यामध्ये ग्रामपंचायतीने रस्त्यावर बसवलेले पथदिवे महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वयोवृद्ध पुरुष, महिला व तरुण मंडळींना अचानक कामानिमित्ताने घराबाहेर पडत असताना गावांमध्ये अंधार पसरला असल्यामुळे गावाची दिशा नक्की कोणती आहे हेच कळत नाही, रात्रीच्या वेळी नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा ही त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे संभापूर ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याची खंत वयोवृद्ध पुरुष, महिला तसेच तरुण वर्गाकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, संभापूर गावात पथदिवे बंद असलेले पाहता चोरांचा देखील सुळसुळाट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच चोरीच्या प्रकरणात वाढ होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी एखाद्या रुग्णाला त्याच्या उपचाराकरिता दवाखान्यामध्ये घेवून जाण्यासाठी निघाले असता पोलावरचे पथदिवे बंद झाल्याने त्या नागरिकांना अंधाराचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. पोलावरचे पथदिवे असल्याने बाहेर गावातील चोरट्याचा मजाव होऊ शकतो,एखाद्या तरूण मुलांचे रात्रीच्या वेळी एखाद्याचा भांडण तंटा झाल्यास त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संभापूर ग्रामपंचायतीने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष द्यावे व बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरु करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Previous article*राखीच्या धाग्यात पावित्र्याची अतुट शक्ती!*
Next articleलग्नासाठी मुलगी मिळत नाही; संपत्तीत हिस्सा द्या, मुलांची मागणी, वडिलांनी दिला नकार, अन्…