मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 30/08/2023
पुरातण काळापासून चालत आलेल्या या सणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.
सध्या पवित्र श्रावण मास सुरू असुन, बहिण – भावाच्या अतुट नात्याची महती सांगणारा सण म्हणजे राखीबंधन….
श्रावण पौर्णिमेला येणा-या या सणाच्या दिवशी बहिण आपल्या भावाचे औक्षण करून, प्रेमाचे प्रतिक म्हणून त्याच्या हाताला राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी किंवा भेटवस्तु देतो. बहिण मोठी असल्यास भाऊ बहिणीचे चरणस्पर्श करुन, बहिणीचा आशिर्वाद घेतो. तर भाऊ मोठा असेल तर बहिण भावाच्या पाया पडुन आशिर्वाद घेते. जमिनीवर चटई टाकुन एका ताटात हळद – कुंकु, मिठाई, ज्योत, इत्यादी घेऊन, भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर बहिण राखी बांधते. राखीचे विशेष प्राविण्य जपले जाते. आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी भावाने बहिणीला कुठलीच कमतरता पडु देऊ नये. बहिण भावाच्या या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन…त्यां निमित्ताने सर्व बहिण भावाला साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल वतीने हार्दिक शुभेच्छा..