Home Breaking News पहिल्याच दिवशी ९०० विद्यार्थ्यांची फ्रि डेंटल चेकअप कॅम्प; अॅड.धनश्री देव स्मृती सेवा...

पहिल्याच दिवशी ९०० विद्यार्थ्यांची फ्रि डेंटल चेकअप कॅम्प; अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

अकोला – शाळकरी विद्यार्थ्यांना चाॅकलेट खाण्याची सवय असते. मुलं दातांची योग्य निगा राखत नाही, त्यामुळे दात किडणे, दाताची योग्य वाढ न होणे, दातावर दात येणे, दातात फट निर्माण होणे,वेडवाकडे दात होणे, या समस्यांना शाळकरी मुलं- मुली हे त्रस्त असतात. या शाळकरी मुलांच्या दातांच्या आरोग्य तपासण्यासाठी अकोल्यातील अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाने शाळकरी मुलांच्या दातांची मोफत तपासणी सुरु केली आहे. लहान मुलांसाठीच्या या महत्वपुर्ण उपक्रमात आज बाल िशवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या ९०० मुलांचे दातांची तपासणी पहिल्याच दिवशी करण्यात आली. या उपक्रमात शाळेचे अध्यक्ष अविनाश देव,श्री. नरेंद्र देशपांडे अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव, दिलीप काका देशपांडे, जयंतराव सरदेशपांडे, प्रा.रश्मी देव, इंडियन डेंटल असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ.अभिषेक तिडके, सचिव डाॅ.तुषार रोठे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता जळमकर,सौ.कीती चोपडे,सौ.राघीनी बक्षी, आदींची उपस्थिती होती.
शाळकरी मुलांच्या दातांचे आरोग्य तपासणीत इंडियन डेंटल असोसिएशनने देखील मोठी मदत केली असून त्यांच्या संपुर्ण टिमच्या वतीने या उपक्रमात विविध शाळांमध्ये दातांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. आजच्या फ्रि डेंटल कम्प या उपक्रमात डाॅ.अभिषेक तिडके, डाॅ. तुषार रोठे, डाॅ.योगेश साहू, डाॅ.सचिन वानखडे, डाॅ.दुष्यंत आलिमचंदानी, डाॅ.झुबेर अहमद, डाॅ. सुनील मारवाल, डाॅ.निलेश मालोडे, डाॅ.विक्रांत भागवत, डॉ.सलोनी काटे, डाॅ. अंतरिक्ष दौड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळकरी मुलांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमात यंदा हजारो विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात येणार आहे.

आजच्या डेंटल चेकअप च्या पहिल्या दिवशी शाळकरी मुलांनी अतिशय उत्स्फुर्तपणे या शिबिराला प्रतिसाद दिला. इतकेच नाही तर पालकांनी देखील मुलांच्या दाताच्या आरोग्यासाठी अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमाचे स्वागत करत सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकवृंद तथा संपुर्ण शाळेचे मोलाचं सहकार्य लाभले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश देव, जयंत सरदेशपांडे, दिलीपकाका देशपांडे, रामहरी डांगे,राम उमरेकर, राजेंद्र गुन्नलवार, विजू वाघ,भास्कर बैतवार, ललंन मिश्रा, नरेंद्र परदेशी,अजय शास्त्री, मोहन काजळे, बबलू तिवारी, राजू कनोजीया, निलेश पवार, सुधीर मस्के आदींची उपस्थिती होते.

Previous articleपाचोरा येथील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या लोकप्रतिधी निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन
Next articleबससेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी.