पत्रकारांवर हल्ले होत असतील तर स्वस्त बसणार नाही पत्रकारांना न्याय व लढा देण्यासाठी सदैव जागरुक राहणार……..परमेश्वर गोपतवाड ( जेष्ठ पत्रकार)
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करून पत्रकारावरील हल्ल्याचे खटले जरदगती न्यायालयामार्फत चालवून पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा. व तसेच पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करावा. अशी मागणी हिमायतनगर तालूका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून या वेळी पत्रकार संरक्षण कायद्याची सामूहिक होळी करण्यात आली आहे.
तालूकादंडाधिर्यामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात पत्रकारांच्या वतीने म्हटले आहे की, महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे भारतातील हे पहीले राज्य आहे. महाराष्ट्राचा कायदा हा पुरेसा आणी सक्षम आणी चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरत आहे. पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत. परवाच पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारास शिवीगाळ करून गुंडा करवी मारहाण केली. या घटनेचा तिव्र निषेध,या प्रसंगी नोंदविण्यात आला आहे. व तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने सामूहिक रित्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली आहे. वेगाने कायद्याची अंमलबजावणी करूण पत्रकारांवरील हल्ले थांबवावे. अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.
या वेळी जिल्हासंघटक प्रकाश जैन, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, डिजीटल मिडीया परिषदेत चे कार्याध्यक्ष अनिल मादसवार, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, अशोक अनगुलवार, सचिव सोपान बोंपीलवार, दिलीप शिंदे, मनोज पाटील, के. एम. कवडे, शुद्धोधन हनवते, मारोती वाडेकर, अनिल नाईक, दत्ता पपूलवाड, धम्मपाल मुनेश्वर, नागोराव शिंदे, विजय वाठोरे, गुंडेकर आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.