Home Breaking News श्रीक्षेत्र बोरगडी येथे पुरुषोत्तम अधिक मास निमीत्त अखंड श्रीराम नाम जपाची सांगता…*

श्रीक्षेत्र बोरगडी येथे पुरुषोत्तम अधिक मास निमीत्त अखंड श्रीराम नाम जपाची सांगता…*

प.पुज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव यांच्या उपस्थितीत सार्वजनिक धोंड्याच्या पगंतीने सांगता…

हि.नगर ग्रामीण तालुका
प्रतिनिधी/माधव काईतवाड बोरगडीकर

हिमायतनगर:-तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथे प.पुज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुरूषोत्तम अधिकमास चा पुर्ण महिना अखंड श्रीराम नाम जप चालु होता. त्यानिमित्ताने आज मागील अखंड एक महिन्या पासुन चालु असलेल्या श्रीराम जपाची सांगता संत प.पु.श्री. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत सार्वजनिक धोंडे जेवणाची पंगत पुर्ण गाव चुल बंद प्रसादाचे आयोजन करुन सांगता करण्यात आली.यावेळी प.पुज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले नाम जप हा कली युगाचा खुप मोठा जप आहे.राम नाम जप ठेवण्याचा मुख्य हेतु देवनामस्मरणापासुन दुर असणाऱ्यासाठी होय.सतियुग,द्वापरयुग,कलीयुग या तीन्ही युगात कलीयुग हे सर्व श्रेष्ठ आहे.संसार करतांना देवाच्या नाम स्मरणाचा आधार घेऊन संसार करा.देवाच्या कृपेने काही कमी पडणार नाही.कारण भारत देश हा साधु संतांच्या
पावन पद प्रशाने पावन देशआहे.
आपण जिवन जगत असताना आपल्या धर्माचे रक्षण महत्वाचे आहे.
आपल्या धर्माचे पालन हेच जिवनाचे सार्थक होय.
पाश्चिमात्य शिक्षण घेत असताना त्याचा उपयोग फक्त व्यवहारासाठी करा.आणि आपल्या भारतीय संस्कृती चा ह्रास होणार नाही यांची काळजी घेवुन जिवन जगा.यावेळी ते आपल्या जिवना विषयी सांगताना म्हणाले श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे दत्त संस्थान मठात मागच्या ४६ वर्षापुर्वी प्रभुची सेवा करण्यासाठी एकही साधु संत राहण्यास तयार होत नव्हते.
कारण तेथील देवीक शक्ती पाखंडी साधु संतास थारा देत नव्हती पण मि सहज प्रभुचे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि मला मागील ४६ वर्षांपासून प्रभुची सेवा करण्याची संधी मिळाली.महाराज यावेळी उपस्थित गावकरी जनसमुदायास सांगत होते.जिवन जगतांना व्यसनापासून दूर राहुन देवाच्या नाम स्मरणात तल्लीन व्हा जिवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही.यावेळी महाराज सार्वजनिक धोंडे जेवनाच्या पंगतीमध्ये पाहणी करुन गावकऱ्यांच्या अचुक नियोजनाचे कौतुक केले.महाराजांच्या मुखातुन झालेल्या कौतुकामुळे गावकऱ्यांचे मन गहिवरून आले.यावेळी समस्त गावकरी व परिसरातील भाविक उपस्थित होते.

Previous articleकारला येथील सेवा सहकारी सोसायटी मध्ये ध्वजारोहन…..
Next articleपाचोऱ्याचे आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी:- खामगाव प्रेस क्लबचे निवेदन…