वाडेगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा दुरुस्ती करण्यासाठी वाडेगावातील माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते प्रीतम डोंगरे व त्यांचे सहकारी गजानन डोंगरे व समस्त आर्यन्स ग्रुप यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी दहा वाजता पासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहे प्राथमिक जिल्हा परिषद कन्या शाळा ची खूप दयनीय अवस्था आहे मुलींना पिण्याचे पाणी योग्य प्रकारे सोय नाही स्वच्छालय गृह नसल्यामुळे फार मोठी समस्या आहे जोपर्यंत या सर्व समस्या ते निवारण करण्यात येत नाही व आमच्या मागण्या मंजूर केल्या जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही व वाडेगावातील एका जिल्हा प्राथमिक शाळेसाठी भरपूर निधी दिला जातो परंतु जे मुलींचे हक्काची शाळा आहे त्या शाळेसाठी निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे मोठी वाडेगावातील पालकांची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे माजी सैनिक दिलीप डोंगरे ,गजानन डोंगरे,सागर सरप,किशोर अवचार,प्रमोद प्रकाश डोंगरे,अमोल डोंगरे,संजय जोरेवार,सुनील कळम,विजय डोंगरे,सोनू डोंगरे, सूरज अवचार, विषांत डोंगरे,पंकज डोंगरे,मंगेश डोंगरे,नागेश डोंगरे,नंदू डोंगरे,रोहित डोंगरे,प्रेम डोंगरे उपस्थित होते
“प्राथमिक जि प कन्या शाळा मध्ये स्वच्छ स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची जोपर्यंत सोय होत नाही व या शाळेला निधी विकास कामासाठी दिला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही”
प्रितम डोंगरे माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते