अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
हिंगोली लोकसभा मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या हेतूने खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पोफाळीचा ७ वर्षापासून बंद पडलेला वसंत कारखाना केवळ ६ महिन्यात सुरू केला इतकेच नव्हे तर साखर सम्राटांपेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांनी सर्वाधिक भाव दिला ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी येथे काढले.
हिमायतनगर येथील आयोजीत सर्व रोगनिदान आरोग्य शिबीरात उद्घाटना नंतर भाषण करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, यवतमाळ जिल्हा परीषदेचे सदस्य चितंगराव कदम, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपाचे तालुकाप्रमुख आशिष भाऊ सकवान, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शितल भांगे, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार आदित्य शेंडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मंत्री संजय राठोड म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्याचे आमचे खासदार हेमंतराव पाटील जावई आहेत. राजश्रीताई आमच्या भगिणी आहेत. त्यांनी देखील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी मोठे काम उभे केले आहे. हेमंतराव पाटील यांना काम करतांना पाहतो त्यांच्या माध्यमातुन पैनगंगा नदीवर साखळी पध्दतीने बंधारे, पुलांची कामे झाली पाहिजेत असा सतत प्रयत्न सुरू होता. त्यासाठी १६०० कोटी रूपयाची मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात नाल्यावर बंधारे, तलाव पाहिजे असल्यास खासदार हेमंत पाटील आणि बाबुराव कदम कोहळीकर यांच्या माध्यमातुन मागणी करत मृद जलसंधारण विभागाकडे प्रस्ताव दिल्यास ती सर्व कामे पुर्ण केली जातील असा विश्वास उपस्थितां मंत्री श्री राठोड यांनी दिला
लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीराच कौतुक केले. यावेळी माजी जि. प. सदस्य संभाराव लांडगे, बालासाहेब कदम, बी एन चव्हाण, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे, नगरपंचायत चे मुख्याधिकारी सूर्यकांत ताडेवाड, डॉ. असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर डॉ. गणेश कदम यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
खासदार हेमंत पाटील बोलताना म्हणाले की, सात वर्षे बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करून ऊसाला प्रतिटन २५०० रुपये भाव दिला व त्याचा तात्काळ मोबदला शेतकऱ्यांचा पदरात पाडण्याच काम केलं, विदर्भ मराठवाडा विभाजनात पैनगंगा नदीच्या माध्यमातून पुल, बंधारे, रस्त्यांसाठी १६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. विकासाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम होत आहे. यामुळे १५००० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही कामे होत आहेत. हे शेतकऱ्यांच गोर गरीबांच सरकार आहे असे खासदार हेमंत पाटिल यांनी सांगितले. मंत्री महोदय संजय राठोड यांनी ५७५ कोटी रुपयांचा भरीव निधी पोहरादेवी संस्थानला दिला, नुसती घोषणा केली नाही, तर कामाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र तेलंगाना राज्यात, भारतात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. त्यांच्या भावनांचा आदर मा. मंत्री संजय राठोड यांचे कडुन होत आहे. आयोजीत कार्यक्रम प्रसंगी लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी घडवुन आणलेल्या आरोग्य शिबीरा करीता शुभेच्छाही त्यांनी दिल्या. शिबीरात २३०० रूग्णांवर उपचार करण्यात आला तर ४२३ रूग्णांवर शस्त्रक्रीया करावी लागणार असुन लवकरच त्यांना पुढील उपचारार्थ रवाना करण्यात येणार आहे.