Home Breaking News हिमायतनगर येथील आरोग्य शिबीराचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याच लोकनेते बाबुराव कोहळीकर यांच...

हिमायतनगर येथील आरोग्य शिबीराचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याच लोकनेते बाबुराव कोहळीकर यांच आवाहन

????आरोग्य शिबीरात 70 च्या वर तज्ञ डॉक्टरा मार्फत होणार विविध आजारांवर तपासणी…श्री.बाबुराव पाटील कोहळीकर

भुमिराजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी/माधव काईतवाड बोरगडीकर

हिमायतनगर:-शहरात दि. १३ रविवारी होत असलेल्या सर्व रोगनिदान आरोग्य शिबिरासाठी गरजु रुग्णांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, अस आवाहन लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी केल आहे. या शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्णावर उपचार व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रीया केली जाणार आहे.

हदगाव – हिमायतनगर विधानसभा क्षेत्रात आदिवासी बहूल भागातील नागरिकांना आरोग्यासाठी मोठा दवाखाणा उपलब्ध नाही, नांदेड – मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन महागडे उपचार घेणे परवडत नाही त्यामुळे वेळ जातो आणि पैसा खर्च होतो. पैशा अभावी काही रूग्ण आजार अंगावरच काढतात त्यांची आजारातून सुटका करण्यासाठी लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर प्रांगणात आज दि. १३ रविवारी भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

आरोग्य शिबीराचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, प्रमुख पाहुणे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटिल, शिवसेना उपनेते आनंदराव जाधव, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, यांची उपस्थिती राहणार आहे.

शिबीराचा सर्व रूग्णांनी लाभ घ्यावा, गरजु पर्यंत माहिती पोहचवावी अस आवाहन कोहळीकर यांनी पत्रकारांशी माहिती देतांना केल आहे.

Previous articleपावसाअभावी पिकांची वाढ खुंटली.
Next articleवंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने व्याळा सर्कल कार्यकारणी बैठक संपन्न*