मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 12 /08/2023
खरीप हंगामातील यावर्षी कधी सततच्या पावसामुळे तर कधी पावसाअभावी पिकांची वाढ होत नाही. पावसाने दडी मारल्याने हलक्या ते मध्यम जमिनीतील पिकांची वाढ खुंटली आहे. हळद, कापुस, सोयाबिन, उडीद, मुग या पिकांचे पाऊस नसल्यामुळे माना खाली टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वेळेवर पाऊस पडला तर पिकांची वाढ चांगली होते. आणि उत्पादनात चांगली वाढ होते. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
वेळेवर पाऊस पडावा म्हणून ग्रामीण भागात देवाला नैवेद्य दाखवून, साकडे घातले जात आहे.