Home Breaking News त्रंबकेश्वर तीर्थावर हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी होणार ऐतिहासिक साजरी.

त्रंबकेश्वर तीर्थावर हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी होणार ऐतिहासिक साजरी.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

नर्मदा गोदावरी जलाने होणार मातेच्या पुतळ्याचा जलाभिषेक

हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीमार्फत राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, ऐतिहासिक स्वरूपात व साधुसंत महात्मे वारकरी मंडळी, टाळ मृदुंगाच्या गजरात,पालखी घेऊन धार्मिक वातावरणात, महाराजा यशवंत राजे होळकर वंशज होळकर घराणे महेश्वरी, महामंडलेश्वर श्री 1008 दादू महाराज अधिष्ठाता .गजा सीन शनि धाम इंदौर, गुरुवर्य माधव महाराज घुले इगतपुरी ,स्वप्निल राजे होळकर होळकर घराणे वंशज इंदोर, सुधीर भाऊ देडगे,योगेश महाराज गवारे, यांच्या उपस्थितीत स्मृतिदिन येत्या 13 ऑगस्ट वार रविवार रोजी दुपारी 3वाजता साजरी होणार आहे हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना यांनी भारतातील पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भागात सर्व धार्मिक ठिकाणावर तीर्थक्षेत्रावरती आपल्या कार्याचे पाऊलखुणा आहे. या मातेने बारा ज्योतिर्लिंग यांचा जीर्णोद्धार चारधाम ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार, पूर्वेला पुरी जगन्नाथ, पश्चिमेला सोमनाथ, दक्षिणेला रामेश्वर ते उत्तरेला काशी, श्रीनगर हरिद्वार बद्रीनाथ प्रयागराज, वाराणसी नासिक ओंकारेश्वर उज्जैन महाबळेश्वर श्रीशैलम इंदोर राजमाता अहिल्यादेवी ने भारतात असे शेकडो मंदिर या मातेने उभारले परंतु कुठेही स्वतःचे नाव देऊन गाजावाजा केला नाही त्यावेळेस या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नसत्या तर आज आपल्यांना एकही धार्मिक ठिकाण बघायला मिळाले नसते यामध्येच ही त्रंबकेश्वर नगरी आहे. या तीर्थक्षेत्रावरती हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्र्यंबकेश्वर नगरी वसवण्यात खूप मोठा हातभार लावलेला आहे. त्यामध्ये चार ते पाच कुंड, कुशावर्तो निर्मिती,गंगासागर,निल पर्वत जवळील नीलसागर. प्रयाग तीर्थ ब्रह्मगिरी मंदिराचा गंगा गोदावरी मंदिराची पुनर स्थापना अनेक मंदिरे घाट बारव, गणपती बारी तीर्थ, त्र्यंबक नगरीतील नदीवरील घाट त्रंबकराज मंदिराचे जीर्णोद्धार, नासिक ते त्र्यंबकेश्वर पर्यंत बारव तलाव अशा अनेक गोष्टींचे काम या हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले आणि आज तागायत कुठल्याही प्रकारे या मातेच्या कार्याचे गौरव या ठिकाणी करण्यात आले नाही त्याच पार्श्वभूमीवर पुण्यतिथीचे आचित्य साधून त्रंबक नगरी मधून धार्मिक ताल विकास पखवाज वारकरी गुरुकुल त्रंबकेश्वर मार्फत दिंडीपालखी सोहळा टाळ शंभर मृदुंग च्या भव्य गजरात, कुशावर्तपरेंत दिंडी ठिकाणी नर्मदा गोदावरी महाअभिषेक, त्र्यंबकराज, अहिल्या आरती महाआरती तसेच राजमातेच्या पुतळ्याचा अभिषेक करून ही पुण्यतिथी धार्मिक पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे . त्यासाठी सर्व जाती धर्मातील जनतेनेतसेच साधू संत महात्मे पुरोहित महासंघ वारकरी मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे याप्रसंगी त्र्यंबकेश्वर नगरीचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर पुरोहित महासंघाचे अध्यक्ष मनोज थेटे विश्वस्त कैलास घुले विश्वस्त कैलास चोथे विश्वस्त स्वप्निल शेलार विश्वस्त पुरुषोत्तम कडलक., विकास बेलुकर महाराज,सामाजिक कार्यकर्ते देविदास भडांगे तांबे महाराज, आयोजक समाधान भाऊ बागल प्रहार जिल्हा चिटणीस श्याम गोसावी सरदार घराण्याची वंशज भाऊसाहेब राजोळे, विनायक कळदाते,अमोल गजभार,प्रशांत बागल कल्पेश शिंदे, हेमंत शिंदे,भूषण जाधव,सोमनाथ पेखळे, विनायक काळदाते, नानासाहेब दोंदे अनंता उपाध्ये, पांडुरंग भडांगे, राजाभाऊ बादाड देवराम भाऊ रोकडे,अण्णासाहेब सपनार वैभव रोकडे विजय चितळकर, , सचिन भडांगे, असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आव्हान करण्यात आले.

Previous articleगिरणा गौरव प्रतिष्ठान गिरजा महिला मंच तर्फे शितल शेगोकार यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड
Next articleपावसाअभावी पिकांची वाढ खुंटली.