ता. प्र :-बाळापूर:- बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या लोहारा हातरुण सर्कल च्या अकोला जिल्हा परिषद सदस्या यांनी कवठा येथील कॅन्सर ग्रस्त आत्माराम चोपडे दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी मयत झाल्याने त्यांच्या दोन्ही मुलीचे १२ वी पर्यंत वाहतूक खर्च व शैक्षणिक खर्चासाठी सौ लीनाताई सुभाष शेगोकार यांनी स्वीकारले कवठा येथील ३५ वर्षीय युवक कॅन्सर आजारपणामुळे दिनांक १ऑगस्ट रोजी मयत झाला. असून त्याच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे .त्याची एक मुलगी वर्ग ४ था मध्ये तर दुसरी मुलगी २ ऱ्या वर्गात उत्कर्ष ज्ञांनपिठ इंग्लिश स्कूल कवठा येथे शिकत असून त्या दोन्ही मुलांना १२ वी पर्यंत इंग्रजी माध्यमाचा सर्व शिक्षण खरच विशेषतः वाहतूक खर्च सह माफ करून दोन्ही मुलीचे पालकत्व गेल्यामुळे लोहारा हातरुण गटाच्या जि प सदस्या तथा उत्कर्ष ज्ञानपीठ स्कूल च्या अध्यक्षा सौ लिनाताई सुभाष शेगोकार यांनी स्वीकारले आहे. यापूर्वी सुद्धा अशा विद्यार्थ्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे गेल्या चार वर्ष पासून संस्कृती डिगोळे रा दगडखेड ह्या विद्यार्थिनी ची आई परितक्त्या असताना त्या मुलीला सुद्धा गेल्या चार वर्षांपासून शाळेत संगोपन जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या शाळेत विद्यार्थी दाखल असताना घरातील कर्ता पुरुष बाबत दुर्घटना घडल्यास त्याबाबत संबधित विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये व दर्जेदार इंग्रजी शिक्षण पालकाच्या नंतर सुद्धा मुलाला मिळावे ह्या हेतूने प्रेरित होऊन सामाजिक भान ठेऊन त्या व त्यांचे पती शासकीय सेवेत असून सामाजिक चळवळीचे कार्य करीत आहेत. आत्माराम चोपडे जिवंत असताना प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शेगोकार साहेब स्वतः गेले असता त्यांच्या जिवंतपणी त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती व मरणासन्न अवस्थेत असलेल्या चोपडे यांना त्यांनी कुटुंबाची काळजी करू नये असे सांगितले होते. लिनाताई सुभाष शेगोकर यांनी आपल्या अकोल्या जिल्हात एक चांगला उपक्रम राबवित आहेत.त्यामुळे त्यांचे आभार लोहारा हातरुण सर्कल नागरिक करीत आहेत.