हि.नगर ग्रामीण ता.प्रतिनिधी/माधव काईतवाड बोरगडीकर
हिमायतनगर:- तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 110 शाळा आहेत या शाळांमध्ये 456 शिक्षकांची पदभरती आहे. पैकी 90 शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तेरा शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत कसे पाठवावे? असा संतप्त सवाल पालकांमधून विचारल्या जात आहे. तर 20 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकच शिक्षक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळा निहाय विद्यार्थ्यांची पदसंख्या खैरगावतांडा 50, आंदेगाव 47, कोत्तलवाडी 38, भिष्याची वाडी 55, कपाटाची वाडी 55, पावनमारी 32, घारापुर 36 , टेंभुर्णी 33, न्यू गणेश वाडी 8, न्यू आंदेगाव 7, वाडाचीवाडी 7, खैरगाव 17, आदी भागातील जिल्हा परिषद शाळेत एवढी पदसंख्या आहे, बदली होऊन गेलेल्या शिक्षकांच्या जागी एकही पदभरती शिक्षक दिलेला नाही. तात्पुरता एक शिक्षक शिकविण्यासाठी जात आहे. तालुक्यातील वीस जिल्हा परिषद शाळा अश्या आहेत. यातील काही शाळा चौथी ते पाचवी वर्गापर्यंत असून यातील अनेक शाळांची पदसंख्या १३० च्या जवळपास आहे. तरीपण या अशा शाळांना एकच शिक्षक सांभाळत आहेत. शंभर ते 123 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक कोणत्या वर्गाला शिकवणार? असा प्रश्न संतत्प पालकां कडुन विचारल्या जात आहे. वडगाव येथील पहिली ते चौथी पटसंख्या 120 असून जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.असे असतानाही शाळेतील शिक्षकांना नांदेड येथुन रीलीव करण्यात आले आहे .असे नाव न छ्यापन्याच्या अटीवर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांने सांगीतले आहे. जिल्हा परिषद नांदेड चा ढिसाळ कारभारामुळे हिमायतनगर तालुक्यातील पदोन्नत मुख्याध्यापक यांची अनेक पदे रिक्त आहेत तसेच तालुक्यात केंद्रप्रमुखाची पदे रिक्त असल्यामुळे याचा शिक्षण विभागावर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे उद्याचे भविष्य घडविणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे अशा तीव्र भावना पालकांमधून व्यक्त होत आहेत