Home Breaking News वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शासकिय, गायरान, शेत जमीन नावावर करण्यासाठी अर्ज...

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शासकिय, गायरान, शेत जमीन नावावर करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आले..*

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी,
आज वंचित बहुजन युवा आघाडी बाळापुर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांचे सरकारी, शासकीय, महसूल, अतिक्रमण, गायरान शेत जमीनी नावावर करण्यासाठी अर्ज भरून तहसीलदार साहेबांना देण्यात आले. अर्ज दाखल करणे ही प्रक्रिया एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव मा.राजेंद्र भाऊ पतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. हे अर्ज गायरान जमीनधारक भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी नियमाकुल करण्यासाठी अर्ज मागवून घेऊन सादर करण्यात आले आहे. त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष संदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडी पंचायत समिती बाळापूर सभापती सौ. शारदाताई सोनटक्के, महिला आघाडी उपाध्यक्ष इंदुबाई वानखडे, युवा आघाडी उपाध्यक्ष राजदार खान, सचिव आकाश सावळे, रामकृष्ण सोनटक्के,सर्कल अध्यक्ष नागेश शिरसाट, योगेश दंदी, सागर उमाळे, प्रसिद्धी प्रमुख रणजीत तायडे, पदाधिकारी व शेतकरी बांधव कार्यकर्ते उपस्थित होते..

Previous articleनियुक्त रूजु ठाणेदार सुनिल आंबुलकर यांचे विविध संघटणने केले स्वागत.
Next articleहिमायतनगर तालुक्यात 90 शिक्षकांच्या जागा रिक्त तर तेरा शाळांना शिक्षकच नाहीत…*