Home Breaking News अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला : श्री शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेध करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (३० जुलै)येथील गांधी जवाहर बागेत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, माजी मंत्री अजहर हुसेन, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, प्रदेश सचिव प्रशांत गावंडे, डॉ.जीशान हुसेन, प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. संजीवनी बिहाडे, अर्जुन थानवी, निखिलेश दिवेकर, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, महेश गणगणे, प्रकाश वाकोडे, अतुल अमानकर, महानगर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पुष्पा देशमुख, जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष पूजाई काळे, विजया राजपूत दिनेश शुक्ला विजय देशमुख, मिलिंद पवार, सागर कावरे, सुरेश ढाकूलकर, शंकरराव लंगोटे, प्रशांत प्रधान, रहमान बाबू, देवेंद्र ठाकरे, सय्यद वाजीद,विनायक कारंजकर, सचिन तिडके, जयप्रकाश वाटुरकर प्रशांत उगले आशिष वाढवे, प्रशांत गावंडे आदी यावेळी उपस्थित होते.

Previous articleअकोल्यात मणिपूर हिंसाचाराविरोधात निषेध मोर्चा !
Next articleएकही शेतकरी अनुदानापासून वंचीत राहणार नाही. यांची जबाबदारी घ्या.