ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही – राजेंद्र पातोडे.
वृत्त संकलन योगेश घायवट :-सातत्याने देश आणि स्वातंत्र्य ह्या विरोधात गरळ ओकणारा संभाजी भिडे सर्वधर्म समभाव वाल्या नेत्यांना जाहीररित्या गांडू-हि*डे म्हणतो तसेच भारतीय स्वातंत्र्यदिनाबाबत व राष्ट्र गीताबाबत आक्षेपार्ह विधानांनी राज्यात अशांतता निर्माण करीत आहे, त्याला वेसण घालण्या ऐवजी भिडेच्या कार्यक्रमाला विरोध करणा-या वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते ह्यांना पोलीसांनी नोटीसच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पोलीसांनी भाजपचे इशा-यावर सुरू केलेली ही दादागिरी बंद करून वातावरण बिघडविणा-या भिडेच्या कार्यक्रमाला राज्यात परवानगी देऊ नये अन्यथा राज्यभरात रस्त्यावर उतरू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव, राजेंद्र पातोडे ह्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
विशेष म्हणजे आजच अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणे १५३ कलम अंतर्गत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.तसेच ह्या पुर्वी संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. १५ ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.“भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी वंदे मातरम म्हणत फासावर लटकून घेतलं ते वंदे मातरम गीत तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही. १८९८ साली पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर यांना ‘जन गण मन’ हे गीत सुचलं ” असं विधान संभाजी भिडे यांनी पिंपरी चिंचवड येथील दिघी परिसरात रविवारी संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यानात केले होते. अशा भिडेंना अटकाव करण्या एवजी देश आणि राष्ट्रगीताचा अवमान करणा-या भिडेंची पाठराखण पोलीसच करीत आहेत.गृहविभागाचे इशा-यावर भिडेना रान मोकळे असुन विरोध करणारे वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जाते आणि नोटीस पाठवुन कार्यवाहीची धमकी दिली जात आहे.वंचित बहुजन युवा आघाडी हे खपवुन घेणार नाही.पोलीसांनी कार्यकर्त्यांना टार्गेट करू नये अन्यथा राज्यभर युवा आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
वास्तविक पाहता भिडे यांना कलम १२४-अ’ नुसार देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्याची हिंमत पोलीसांनी दाखवायला हवी होती.कारण एखाद्या व्यक्तीने लिखाणातून किंवा चिन्हांद्वारे किंवा अन्य मार्गांनी, द्वेष किंवा तिरस्कार घडवून आणण्याचा प्रयत्न केला किंवा तसे करण्यास इतरांना प्रोत्साहन दिले जाणे हा देखील गुन्हा ठरतो.अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबरच येणार्या नैतिक जबाबदारी आणि मर्यादांचा आदर करतो, तसाच देशाबद्दल, राष्ट्रप्रतिकांबद्दल बोलताना, वागतानाही आदर बाळगणे ही नागरिक म्हणून आपली सर्वस्वी जबाबदारीचे भान ठेवून त्यावर व्यक्त नसेल व दंगली घडविण्यासाठी सातत्याने राष्ट्र विरोधात वक्तव्य करीत फिरत असेल तर पोलीसांनी त्याला अटकाव केला पाहिजे.भिडे बरळतात की, जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी १८९८ रोजी हे राष्ट्रगीत इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. त्यामुळे १५ ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही. उलट या दिवशी भारताची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा असे भिडे म्हणालेत. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायंच नमस्कार नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असल्याचे भिडे म्हणाले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने त्यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रगीत ह्याचा अपमान झाल्यामुळे युवा आघाडीचे वतीने राज्य सरकार व पोलीस महासंचालक ह्यांचे खडे लेखी तक्रार करीत सार्वजनिकरित्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असलेल्या भिडे विरोधात देशद्रोहाचं कलम लावण्यात यावं, हि तक्रार २६ जुन २०२३ ला केली आहे.त्यावर पोलीसांनी काहीही कार्यवाही केली नाही.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
९४२२१६०१०१