Home कृषीजागर जिल्ह्यात नदि-नाल्याला आला महापुर; अनेक गावांचा संपर्क तुटुन, शेतीचे मोठे नुकसान

जिल्ह्यात नदि-नाल्याला आला महापुर; अनेक गावांचा संपर्क तुटुन, शेतीचे मोठे नुकसान

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 28 जुलै 2023

नांदेड जिल्ह्यातील दोन दिवसांत या आठवड्यातील दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. नदि, नाले, ओढ्याना प्रचंड महापुर आला, असुन अनेक गावांचा संपर्क तुटुन आहे. तसेच शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर जगाव की, मराव हा मोठा यक्षप्रश्न उभा राहिला. निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेती करणे अवघड झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे. शासनाने त्वरित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 हजार रुपये तात्काळ मदत करावी. अशी मागणी जोर धरत आहे.
???? महामंडळ कंपनीचे सोयाबिन उगवलेच.नाही

शासकीय अनुदानित सोयाबिन बियाणे उगवलेच नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यावर अजुन तरी कुठलाच निर्णय झाला, नसुन शेतकरी बियाण्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

Previous articleपैनगंगा बोरी नदीतून वाहुन गेलेली महीला पाच दिवसांनी डोल्हारी येथे मृत अवस्थेत सापडली..
Next articleहिमायतनगर तालुका कृषी कार्यालय चिखलाच्या विळख्यात…