Home Breaking News विवेकानंद आश्रम जनसंपर्कप्रमुख पदी- डॉ.पंढरीनाथ शेळके

विवेकानंद आश्रम जनसंपर्कप्रमुख पदी- डॉ.पंढरीनाथ शेळके

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

हिवरा आश्रम (25 जुलै) विवेकानंद आश्रमाचे जनसंपर्कप्रमुख म्हणून विवेकानंद आश्रमाचे सक्रिय सदस्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांची आज २५ जुलै ला विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष श्री आर.बी. मालपाणी गुरुजी यांनी नियुक्ती केली आहे. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरहाते, आश्रमाचे सचिव संतोष गोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. पंढरीनाथ शेळके हे विवेकानंद आश्रम सेवा कार्यात गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. परम पूजनीय शुकदास महाराज यांच्या सेवा कार्याला नेहमीच प्राधान्य देऊन *जीव सेवा शिव भावे* या विचाराने सतत सेवा कार्यात सक्रिय असतात. नुकतेच ते कर्णबधिर विद्यालयाच्या प्राचार्य पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. पण आश्रम सेवा कार्यात सक्रिय असल्याने विवेकानंद आश्रम अध्यक्ष आदरणीय मालपाणी गुरुजी व कार्यकारी मंडळांनी त्याच्या सेवेचा सन्मान करून, आज 25 जुलै 2023 रोजी *विवेकानंद आश्रमाचे जनसंपर्कप्रमुख* म्हणून नियुक्त केले. नियुक्ती झाल्याबद्दल आश्रमाच्या वतीने उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरहाते, सचिव संतोष गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. शेळके यांच्या नियुक्तीचे अभिनंदन विवेकानंद आश्रम परिवारातील सर्व स्तरातूनआणि परिसरातील सर्वच जनसमुदायाकडून होत आहे.

Previous articleजलंब येथील तलाठी यांचा मनमानी कारभार
Next articleपैनगंगा बोरी नदीतून वाहुन गेलेली महीला पाच दिवसांनी डोल्हारी येथे मृत अवस्थेत सापडली..