Home Breaking News शेकडो हेक्टर वरील पीके पाण्याखाली.

शेकडो हेक्टर वरील पीके पाण्याखाली.

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

पंचनामा त्वरित करून मदतीची मागणी :-वाडेगाव:-बाळापूर तालुक्यातील मागील दोन तीन दिवसा पासून परिसरात पडत असलेल्या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे अंदाजे शेकडो हेक्टर क्षेत्रा वरील पीके पाण्याखाली गेली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या वर्षीच्या खरीप हंगामात पहिल्याच परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे .तर वाडेगाव भाग दोन मध्ये वाघाडी तसेच सिंगल नाल्याला आलेल्या पुराची झळ नाल्या लगत असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने जवळपास शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीके पाण्याखाली गेली असुन काही ठिकाणी पीकासह शेत खरडून गेल्याचे चित्र आहेत. नाल्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे पुलावर पाणी वाहत असल्याने वाडेगाव चिंचोली मार्गावरील वाहतूक काही तासा करीता बंद पडली होती.तर नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेली पिके जमिनी बाहेर पडलेल्या बियाण्यांचे अंकुर शेतात साचलेल्या पाण्यामुळे सडणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे संबधीत शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे शासन स्तरावरून नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षन करण्याची मागणी करण्यात येत आहे. (वाघाडी तसेच सिंगल नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात पाणीच पाणी असुन पीकांचे नुकसान झाले आहे .त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे. अशी मागणी चिंचोली वाडेगाव येथील शेतकऱ्या सह शेतकरी राजेंद्र घाटोळ यांनी केली आहे..

Previous articleदेशाच्या सिमेवर सेवा करणा-या जवानाचे घर घाणीच्या विळख्यात.
Next articleश्रीक्षेत्र बोरगडी सज्याच्या तलाठ्याचा मनमानी कारभार…