???? पाऊस पाणी वार्ता
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- २२ जुलै २०२३
चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत बसलेला शेतकरी, आणि पेरणीला झालेला उशीर…यातच चिंबचिंब पाणी आल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने काळया आईचे ओटी भरली. हळुहळु बिज अंकुरायला लागले… पिकांच्या रोपटयानी निसर्गाच्या खेळत्या हवेत आपली पान वर काढत, डोलदार पुणे डोलत असतानाच, नियतीच्या मनात काही वेगळेच चालले होते. सतत दोन ते तिन दिवसापासून पाण्याची रीपरीप चालु झाली होती. अचानक गुरुवारच्या रात्रीपासून विजेच्या कडकटाड सुरु झाला. रबरब पावसाचे थेंब पत्रावर पडत होते. पाहता पाहता एक, दोन तास नाहीतर रात्रभर पाऊस धो…धो…कोसळत होता. अचानक सुखी संसाराच्या सुखावर पाण्याने जिवन उपयोगी वस्तुंचा सत्यानाश झाला होता. सकाळ झाली नेहमी प्रमाणे शेतावर जाण्याची वेळ झाली. तोपर्यंत शेतातील पिकांच्या रोपटयांनी मातीत मिसळून प्राण सोडलेला दिसत होता. गुरेढोरे निरागस मुखाने उपाशीपोटी राहुन, कावरं..बावरंं…. मालकाकडे पाहत होती. बरं.झाल जिवीतहानी टळली.
सोयाबिन, कापुस, मुग, उडीद, हळद या पिकांनी नुकतेच बाळसं..धरलेली होती. परंतु त्या रात्रीत त्या पिकांची रोपे पावसांनी वाहुन गेली आहेत. हे दृष्श पाहतांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन अश्रुंच्या धारा वाहू लागल्या. मायबाप सरकार….पेरलेले बियाणे, खते, पेरणी खर्च, त्यातच डबल पेरणी झालेल्या बियाणांचा खर्च आणि तेही आता पावसाने वाहुन गेलेले. आता शेतकऱ्यांच्या मागणीला नियम,अटी न लावता लवकरच भरघोस आर्थिक मदत द्यावी. हिच अपेक्षा आहे.