Home कृषीजागर कृषि विभाग शेतकऱ्यांच्या अडचणींना सोडवतांना आधिकारी  मात्र कुंभकर्णाच्या झोपीत….

कृषि विभाग शेतकऱ्यांच्या अडचणींना सोडवतांना आधिकारी  मात्र कुंभकर्णाच्या झोपीत….

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी

हिमायतनगर \ तालुक्यातील सोयाबिन बियाण्याची पेरणी झाली असली तरी, बियाण्याची उगवण होतच नाही. एक महिना कोरडा दुष्काळ, एक महिना उशिरा पेरणी झाली. महामंडळाच्या बोगस सोयाबिन बियाण्याची हिमायतनगर कृषि सेवा केंद्रवर विक्री झाली आहे.

बोरगडी येथील सर्वे नंबर अनुक्रमे  71, 72  येथील 1 हेक्टर  40आर.या क्षेत्रातील मौजे बोरगडी तांडा नं 1  येथील शेतकरी प्रेम किसन चव्हाण . येथील शेतकऱ्यांनी महामंडळ कंपनीचे सोयाबिन अनुदानित बियाणे परमीटवर खरेदी केले आहे. दिनांक 7 जुलै रोजी पेरलेले बियाणे आज रोजी उगवण झाली नाही. संबंधित दुकानदारस शेतातील सोयाबिन बियाणे उगवलेच नाही. असे सांगितले असता, तुम्ही महामंडळ कंपनीच्या साहेबांना बोला. असे सांगुन आपली जबाबदारी त्यांनी झटकली.

हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी यांचा तालुक्यातील कृषी केंद्रावर लक्ष नसल्याचे शेतकऱ्यांचे आरोप…

हिमायतनगर कृषि केंद्रावर तालुका कृषी अधिकारी यांच कुठलच लक्ष राहिला नाही. म्हणुन कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना बोगस सोयाबिन बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. असे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी प्रतिक्रिय दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या हाती बोगस बियाणे विक्री करणाऱ्या महामंडळ कंपनीच्या अधिकाऱ्यांवर शासन काय? कारवाई करणार याकडे सोयाबिन बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच शेतकऱ्यांना बियाणे, खते, पेरणी खर्च द्यावा. अन्यथा तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी  दिला आहे आसे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Previous articleश्रीक्षेत्र बोरगडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला मंत्रालयात लिपीक.
Next articleसेवानिवृत शिक्षक कंञाटी निर्णय रद्द करुन, शिक्षक अभियोग्यता धारकांना तात्काळ रुजू करावे —-सतिश गोपतवाड