Home Breaking News श्रीक्षेत्र बोरगडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला मंत्रालयात लिपीक.

श्रीक्षेत्र बोरगडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला मंत्रालयात लिपीक.

गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार…

प्रतिनिधी/माधव काईतवाड

हिमायतनगर:-तालुक्यातील ह.भ.प परमपुज्य गुरु श्री बाबा महाराज सातारकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व पवनपुत्र व नवसाला पावणारा हनुमान मंदिर नावाने परिचित असलेल्या श्रीक्षेत्र बोरगडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला मंत्रालयात वरिष्ठ लिपिक.
याबाबत सविस्तर वृत्त असे की 2021मध्ये घेण्यात आलेल्या Mpsc गट- क अंतर्गत परिक्षा मध्ये पाच पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत श्रीक्षेत्र बोरगडी येथील शेतकरी कुटुंबातील सचिन माधवराव काईतवाड हा चांगल्या मार्काने उतिर्ण होऊन मंत्रालय लिपीक पदी विराजमान झाला.त्याचबरोबर बोरगडी नगरीतील मागील काही दिवसांत विविध पदांवर त्यात Mpsc परिक्षेत पास होऊन दारुबंदी पोलीस निरीक्षक म्हणून चंद्रकांत नागुलवाड यांची निवड झाली त्याच बरोबर पोलीस भरती मध्ये चार जनांची निवड त्यात भरत मारोती शेन्नेवाड यांची पालघर पोलीस मध्ये निवड,त्याच बरोबर विठ्ठल उमाजी यन्गुलवाड यांची नांदेड पोलीस मध्ये निवड,व आकाश जाधव व अंकुश राठोड यांची अकोला पोलीस पदी निवड त्याचबरोबर आज लागलेल्या रेल्वे विभागाच्या निकालात श्रीकांत ज्ञानेश्वर काईतवाड हा रायपुर येथे रेल्वे डिझेल मेकॅनिक म्हणुन निवड झाली.या सर्व निकालानंतर श्रीक्षेत्र बोरगडी नागरीकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे.बोरगडी गावांतील लागलेला प्रत्येक मुलगा हा शेतकरी कुटुंबातील असुन त्यांच्या वडीलांना शेतात राबतांना पासुन अतिशय जिद्द व चिकाटीने शिक्षण घेवुन या सर्वांनी विविध पदांवर यश संपादन करुन गावाचे नाव व आई वडीलांचे आव उंचावण्याचे काम यांनी केले.आज सचिन माधवराव काईतवाड यांचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडिया वर अनेकांनी पोस्ट करून आपले प्रेम दाखवले,त्याचबरोबर अनेकांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या त्यात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लाडके आमदार माधवराव पाटील जवळगावकर व गोल्ला-गोल्लेवार यादव समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.नामदेवराव आयलवाड यांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या, आज सचिन माधवराव काईतवाड यांचे गावात आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच प्रतिनिधी सुधाकर पुंडलिक काईतवाड,साई कट्टावाड,फुलसिंग चव्हाण,गणपत काईतवाड, पत्रकार माधव काईतवाड,अवधुत काईतवाड,सोपान यन्गुलवाड, एकनाथ काईतवाड,प्रभाकर काईतवाड,दिगांबर शेन्नेवाड,सह अनेक नातेवाईक व गावातील अनेकांनी शुभेच्छाचा वर्षाव केला.

Previous articleमानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…
Next articleकृषि विभाग शेतकऱ्यांच्या अडचणींना सोडवतांना आधिकारी  मात्र कुंभकर्णाच्या झोपीत….