Home Breaking News प्राचार्य जोगदंड पाटील सरांचे दुखःद निधन.

प्राचार्य जोगदंड पाटील सरांचे दुखःद निधन.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 जुलै 2023

जगदंबा ज्युनिअर कॉलेज माहुर येथील एक वर्षापूर्वी सेवानिवृत्ती, विद्यार्थी प्रिय शिक्षक भगवानराव जोगदंड सरांचे निधन झाले आहे.
त्यांच्यावर आज शिरड शहापुर त्यांच्या मुळगांवी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद हिमायतनगर येथील शाळेत काही वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले, माझे गुरूवर्य, शिस्तीचे उपभोक्ते, नियमांचे काटेकोर पालन करुन, विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व आणि अभ्यास, खेळ, खेळाडु कसा असावा. असे बरेच काही आम्ही त्यांच्याकडुन शिकलो. विद्यार्थी प्रिय शिक्षक, जगदंबा ज्युनिअर कॉलेजचे माहुरचे प्राचार्य स्व. भगवानराव जोगदंड सरांचे यांचे दुखःद निधनाची वार्ता कळतांच मनाला अतिदु:ख झाले आहे. हिमायतनगर तालुक्यात त्यांचा विद्यार्थी वर्ग खुप मोठ्या प्रमाणात आहे. प्रार्थनेची शिट्टी वाजली की वाजली सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोन मिनीटात रांगेत चुपचाप उभे राहायचे. सरांचा कडक आवाज सावधान…….. विश्राम……जणु काही टाचणी पडली तरी आवाज येयायचा. असे शिकक्ष पुन्हा होणे नाही.
तिनं वर्षापुर्वी माहुरला भेट झाली होती. बघताच क्षणी मला काय रे फोजी म्हणुन प्रेमाची हाक मारत, ईकडे कुठे आलास, काय करतोस डोक्यावरुन हात फिरवत जिवणाला नविन उर्जेचा स्त्रोत निर्माण करणारे गुरुवर्य स्व. जोगदंड सरांना साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनलच्या वतीने भावपूर्ण आदरांजली ????????????????????

शोकाकुल….
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
मो. 9763126813

Previous articleहिमायतनगरच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या घेतलेले फेरफार रद्द करा
Next articleTest