Home Breaking News हिमायतनगरच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या घेतलेले फेरफार...

हिमायतनगरच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या घेतलेले फेरफार रद्द करा

दोघांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीने केली मागणी

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनिधी

हिमायतनगर। शहरात कार्यरत असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी, हिमायतनगर यांनी पदाचा गैरवापर करुन वेकायदेशिररित्या शेत सर्वे नं. 417/2 व 417/3 मधिल
घेतलेले फेरफार क्रं. 7837, 7838 व 7839 हे रद्द करण्यात यावे आणि संबंधिताना शासकीय सेवेतून बडतर्फ करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करून मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या परमेश्वर जाधव नामक शेतकऱ्याची पत्नी श्रीमती जोत्सना परमेश्वर जाधव, रा. परमेश्वर गल्ली, हिमायतनगर ता. हिमायतनगर जि. नादेड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड व उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीने म्हंटलं आहे की, माझे पतीची वडीलोपार्जीत मालमत्ता जी मौजे हिमायतनगर ता. हिमायतनगर शिवारात असुन, ज्याचा शेत सर्वे नं. 417/2 क्षेत्रफळ 00.06.14 आर आकार 0.17 पैसे व 417/3 क्षेत्रफळ 0.02.98 आर आकार 0.21 पैसे अशी शेतजमिन आहे. माझ्या पतीच्या अशिक्षित पानाचा फायदा घेण्यासाठी माझ्या पतीस दारु पाजुन हिमायतनगर येथील शेख इम्रान शेख अन्वर व मिर्झा जुनेद बेग अमीर बेग यांनी जबरदस्ती नगर पंचायत हिमायतनगर मध्ये कार्यरत संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांला हाताशी धरून, नगर पंचायत हिमायतनगर येथुन नमुना नंबर 43 व मालमत्ता नोंद प्रमाणपत्र घेवुन मा. दुय्यम निबंधक कार्यालय, हिमायतनगर येथे केंव्हा व कधी नेवुन विक्री खत करुन घेतले आहे. याची मला कांहीही माहिती नाही व माझी संमती सुध्दा घेतलेली नाही. माझ्या पतीकडुन दारुच्या नशेत करुन घेतलेल्या विक्री खतांवर आमचा शेत सर्वे नंबर 417/2 व 417/3 चा 7/12 अकृषिक परवाना तसेच ले-आऊट खरेदी खतामध्ये कुठेही जोडलेले नसतांना व आमच्या शेत सर्वे नंबरचा आदेश झालेला नसतांना, माझ्या शेत सर्वे नंबर वरील आमच्या मालकीचे क्षेत्र 7/12 वरुन बेकायदेशिररित्या कमी करण्यांत आले आहे.

हा सर्व प्रकार त्या विक्री खता आधारे हिमायतनगर सज्जाचे तलाठी श्री. दत्तात्रय शाहुराव पुणेकर व मंडळ अधिकारी श्री. दिलीप परसराम राठोड यांनी माझ्या पतीकडुन दारुच्या नशेत करुन घेतलेल्या विक्री खताला नगर पंचात नमुना नंबर 43 व मालमत्ता नोंद (गावठाण) प्रमाणपत्र. त्या नमुना नंबर 43 व मालमत्ता प्रमाणपत्राचा आमच्या मालमत्तेशी कोणताही संबंध नाही. आमची मालमत्ता हि शेती स्वरुपाची असुन, त्याला कोणत्याही प्रकारचा अकृषिक आदेश झालेला नाही. सदर आमच्या शेत सर्वे नंबर 417/2 व 417/3 ची मालमत्ता हि आमच्या पिडीत कुटूंबाची एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे. या व्यतीरिक्त आमच्याकडे कोणतीही शेतीची मालमत्ता नाही. हिमायतनगर सज्जाचे तलाठी श्री. दत्तात्रय शाहुराव पुणेकर, मंडळ अधिकारी श्री. दिलीप परसराम राठोड व शेख इम्रान शेख अन्चर आणि मिर्झा जुनेद बेग अमीर बेग यांनी संगनमत करुन आमची मालमत्ता बेकायदेशिररित्या व बळजबरीने हडप केली आहे.

वरील चौघांकडुन मालमत्ता हडप करण्यांसाठी माझ्या पतीला वारंवार शिवीगाळ व जिवे मारण्यांच्या धमक्या देण्यांत आल्या होत्या. वरील चौघांकडुन होणाऱ्या त्रासास व मालमत्ता बळजबरीने हडप केल्याच्या कारणावरुन माझ्या पतीस असह्य असा मानसीक त्रास झाल्यामुळे माझ्या पती परमेश्वर जाधव यांनी विषारी औषध घेवुन जिवन संपविले. त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्युस हिमायतनगर सज्जाचे तलाठी श्री. दत्तात्रय शाहुराव पुणेकर, मंडळ अधिकारी श्री. दिलीप परसराम राठोड व शेख इम्रान शेख अन्वर आणि मिर्झा जुनेद बेग अमीर बेग हे जवाबदार असल्यामुळे शासकीय सेवेतील तलाठी व मंडळ अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करुन वरील चौघांवरही सदोष मनुष्य वधाचा व फसवणुकीचा गुन्हा नोदविण्यांत यावा. आत्महत्याग्रस्त पिडीत शेतक-यांच्या कुटूंबाची ही कळकळीची विनंती निवेदनातुन केली आहे.

तसेच बेकायदेशिर व बळजबरीने नोंदविलेले फेरफार रद्द करुन आमची नांवे 7/12 ला पुर्ववृत्त नोंद करण्यांत यावी. असे न झाल्यास आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबातील सदस्यांला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. असेही दिलेल्या निवेदनात म्हंटले असून, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी साहेबांनी संबंधित प्रकरणात तात्काळ निर्णय घेवुन आम्हा जाधव परिवारास न्याय दयावा, न्याय न मिळाल्यास पुढील घडणाऱ्या अनुचित प्रकारास संबंधित प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असेही दिलेल्या निवेदनात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी श्रीमती जोत्सना परमेश्वर जाधव, रा. परमेश्वर गल्ली, हिमायतनगर ता. हिमायतनगर जि. नादेड यांनी म्हंटले आहे, या निवेदना सोबत विक्री खताच्या झेरॉक्स प्रती व फेरफार नकला जोडून दिल्या आहेत.

हिमायतनगर येथील तलाठी मंडळ अधिकारी एरवी कोणत्याही व्यक्तीने फेरफारसह ईतर कोणतीही कामे घेऊन गेल्यास माया मिळावी म्हणून नियमावर बोट ठेवून नियमात बसत नसलेले कामे आम्ही करत नाही असा पारदर्शकतेचा आव आणतात. आणि टेबलाखालून बंडल दिल्यानंतर बेकायदेशीर रित्या फेरफार नोंदी घेतात त्याचेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या फेर नोंदीचे हे जिवंत उदाहरण समोर येत आहे. यावरून तलाठी मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous articleमनसेच्या एक सही संतापाची मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद..
Next articleप्राचार्य जोगदंड पाटील सरांचे दुखःद निधन.