संपूर्ण मिडिया महाराष्ट्रातील जनतेला भावनिक बनवितं आहे, शरद पवार साहेबांचे जुने मित्र,त्यांच्या आठवणी,सुप्रिया सुळे चे व्हिडिओ, रोहित पवारांचे सतरंजी वर बसुन भाषणं ऐकणे ८३ वर्षाचा योद्धा…वगैरे वगैरे…!!
सत्ता वंचितांनो तुम्ही विचारले पाहिजे हे सगळं ८३ व्या वर्षी शरद पवार साहेब वंचितांसाठी करतं आहेत की, पवार कुटुंबासाठी…???
सतत ५० वर्षे सत्तेत असूनही त्यांना अजुनही सत्ता हवी आहे.सत्तेची हाव सुटतं नाही आणि विशेष म्हणजे ती सत्ता आपल्या कुटुंबासाठी हवी आहे….!!
इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आणि सोशल मीडियावर जो भावनिकतेचा मारा चालला आहे त्यातून जी सत्ता प्राप्ति करायची आहे त्याचा फायदा कुणाला.? अर्थातच घराणेशाहीला ज्या घराणेशाही ने लोकशाहीचा गळा घोटला आहे….!!
आम्हाला भावनिक साद घालून लोकशाही संपवण्याचा जो प्रयत्न चालला आहे त्याला सत्ता वंचित समुहाने बळी पडू नये हीच अपेक्षा…!!
मिडिया मार्फत एका बाजूला संविधान संपवण्याची भाषा करणारे भाजपा आरएसएस हे ऊघडं शत्रू तर दुस-या बाजूला घराणेशाही च्या माध्यमातून लोकशाही संपवणारे छुपे शत्रू यांच्या मध्ये सामना आहे अशी बतावणी केली जात आहे…!!
मात्र प्रत्यक्षात तसा कोणताही सामना नसुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सत्तेसाठी केव्हाही एकत्र येऊन सत्ता ऊपभोगणारे सत्ता पिपासु आहेत हे सत्ता वंचित समुहाने समजून घेऊन वाटचाल करावी…!!
वंचितांच्या सत्ता सहभागासाठी, मुस्लिम समुदायाच्या भयमुक्त जगण्यासाठी, दलितांवरील अन्याय अत्याचारा साठी ,आणि आदिवासी भटक्या विमुक्त समुहाच्या आर्थिक विकासासाठी गेली ५० वर्षे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत राहूनही काहीच केले नाही मग आम्ही तुम्हाला योद्धा कसे समजावे…???
२०१९ मध्ये तुम्ही पावसात भिजून सत्ता मिळविली परंतु गरीब मराठ्याला उपमुख्यमंत्री करु शकले नाही उपमुख्यमंत्री तुमचा पुतण्याच झाला हे वास्तव आम्ही कसे विसरावे…??
म्हणून वंचितांनो मिडिया ने चालविलेल्या भावनिकते च्या जाळ्यात अडकू नका सावधान…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने. 9960241375