???? ” विकास” गेला कुठे?
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 09 जुलै 2023
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. यावर्षीचा उशिरा पडलेला पहिल्याच मोठया पावसाने रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य आले आहे. पावसाळ्यात रोडवरील साचलेले पाणी जागच्या जागी साचत असुन, रोडच्या कडेला पावसाळ्यापूर्वी पाणी जाण्यासाठी नाल्या काढलेल्या नाहीत. म्हणुनच रस्ताची बिकट अवस्था झाली आहे. पवना, आंदेगांव, टेंभी, हिमायतनगर कडे जाणा-या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून, ग्रामीण भागातील रस्ते बनविण्यासाठी खर्चलेला निधी गेला कुणीकडे? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना, स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातील रस्ते पक्के का? बनत नसतील. हाही प्रश्न अनुत्तरित आहे. केलेले रस्ते वर्ष भरात उखडुन जात असतील तर सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न तो म्हणजे ” विकास” गेला कुणीकडे!
मर्जीतील गुत्तेदार यांना कोट्यवधी रुपयांची कामे देऊन, गुतेदारांनी केलेली कामे हि मलीदा खाण्यासाठी आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. लोकप्रतिनिधींनी या बाबींचा विचार करून ” खेडे हे विकासाचे केंद्रबिंदू आहे. खेड्यातील लोकांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही” यांचा गांभीर्याने विचार करुन, शेतकरी, शेतमजुर, नागरीक यांना पक्के रस्ते बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी होत आहे.