Home Breaking News वात्सल्य वृद्धाश्रम नाशिक येथे प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांचा ३५ वा वाढदिवस...

वात्सल्य वृद्धाश्रम नाशिक येथे प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांचा ३५ वा वाढदिवस साजरा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

आहिरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी नाशिक व सागर आडगावकर ज्वेलर्स नाशिक व विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला.

काल ५ जुलै 2023 रोजी विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक व पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांचा ३५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सर्वात अगोदर सरांचा वाढदिवस *आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक* येथे विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीस उत्तीर्ण विद्यार्थी व प्राध्यापक वृंदांच्या समवेत साजरा झाला.
त्यानंतर *सागर आडगावकर ज्वेलर्स नाशिक* येथे साजरा झाला समवेत सागर आडगावकर ज्वेलर्सचे संचालक मा. सागर आडगावकर व नाशिक पंचवटीचे(PSI)मा. राम घोरपडे तसेच (Deputy Commissioner मा. किरण अहिराव साहेब, अभिनेत्री मा. रूपाली पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
*वात्सल्य वृद्धाश्रम नाशिक* येथे ७० पेक्षा जास्त आजी-आजोबांसोबत वाढदिवस साजरा झाला सरांचे औक्षण करून केक कापून वाढदिवस साजरा झाला व सरांनी आई वरची कविता म्हणून दाखवली सर्वांशी हितगुज साधून फळे वाटपाचा कार्यक्रम करून तसेच सर्व आजी आजोबांसोबत आनंदाने नाचून गाऊन तसेच आजी आजोबांनी शुभाशीर्वाद सरांना दिले.अतिशय सुंदर पद्धतीने वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी समवेत वात्सल्य वृद्धाश्रमाचे संचालक ओम सर तसेच माधुरी सूर्यवंशी, धनश्री, प्राचार्य अनिल धीवर व विजय सर उपस्थित होते.
तसेच विविध ठिकाणी केक कापून तसेच नातेवाईक समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला व प्रत्यक्ष आहिरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी नाशिक येथे आहिरे सरांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मित्र परिवार, विद्यार्थी,नातेवाईक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleहिंगोली लोकसभा व हदगाव विधानसभा मध्ये कमळ फुलवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही ..
Next articleग्रामीण भागातील रस्ते झाले चिखलमय!