Home राजकारण हिंगोली लोकसभा व हदगाव विधानसभा मध्ये कमळ फुलवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही...

हिंगोली लोकसभा व हदगाव विधानसभा मध्ये कमळ फुलवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही ..

???? मा. केंद्रिय मंत्री सूर्यकांता ताई पाटील यांचे प्रतिपादन

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक-08 जुलै 2023

आज हिमायतनगर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे मोदी @9अभियानाअंतर्गत, हदगाव-हिमायतनगर विधानसभा तील सर्व भाजपा बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत टिफीन बैठकी (डब्बा पार्टी)अयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची 9 वर्षे सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची शेतकरी कल्याण आरोग्याच्या विविध योजना देशात अखंडता एकता निर्माण करणाऱ्या सुशासित असे, देश हिताच्या विविध योजना माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कारकीर्दीमध्ये केंद्रातील सरकारने व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवाव्या. व अंत्योदयांच्या विचारातून भाजपा कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करावे. पक्ष बांधणीच्या अनुषंगाने भाजपाच्या वरिष्ठ नेत्या माजी केंद्रीय ग्रामविकास हदगाव हिमायतनगर विधानसभेचे प्रमुख संयोजक
राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता ताई पाटील हदगाव हिमायतनगर विधानसभेचे अध्यक्ष निळू पाटील जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुधाकर पाटील, हादगावचे तालुका अध्यक्ष तात्याराव पाटील, हिमायतनगर भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, व्यंकटेश लोणे, युवा मोर्चाचे सचिन पाटील कामारीकर, किशनराव पाटील वानखेडे, यल्लाप्पा गुंडेवार, सीएन कदम, संजय गोसलवाड, कांता गुरु वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टिफिन बैठकीचे (डब्बा पार्टी )आयोजन करण्यात आलेले होते* या बैठकीच्या अनुषंगाने सूर्यकांता ताई पाटील यांनी हिंगोली लोकसभा व हदगाव -हिमायतनगर विधानसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये, भारतीय जनता पार्टी तर्फे या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या कमळ फुलवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हिंगोली लोकसभेच्या व हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या बूथनिहाल आढावा व प्रत्यक्षात भेट देऊन, भारतीय जनता पार्टी माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामाचा आढावा तळ्यागाळातील लोकापर्यंत भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोचण्याचे कार्य येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ण करुन, परिसर पिंजून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आज आयोजित केलेल्या टिफिन बैठकीमध्ये लाभार्थी सन्मान हे कार्यक्रमास घेण्यात आले होते. टिफिन बैठक यशस्वी करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी, शहराचे अध्यक्ष खंडू चव्हाण, महेश आंबिलगे, मधुकर पांचाळ, खान पठाण, सुभाष माने, गंगाधर मिरजगावे, परमेश्वर सूर्यवंशी, विकास कळकेकर, सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड, जीवन जयस्वाल, ज्ञानेश्वर शेवाळे, प्रमोद शिरफुले, दुर्गेश मंडलवार, गणेश सूर्यवंशी, विनोद दुर्गेकर, उमाटे बापू यासह भारतीय जनता पार्टीचे हिमायतनगर तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजवळगाव पारवा (खुर्द) ते पोटा जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था…..
Next articleवात्सल्य वृद्धाश्रम नाशिक येथे प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांचा ३५ वा वाढदिवस साजरा