अंगद सुर्वे प्रतिनिधी भूमीराजा
अनेक वर्षांपासून पारवा खु. येथील जनतेला रस्त्याआभावी अनेक संकटातून जाव लागत आहे…
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी
हिमायतनगर तालुक्यातील तसेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या गावालगत जाणार जवळगाव ,पारवा खुर्द, येथुन जाणारा गावजोड पासून रस्ता अतिशय खडेमय खडखडीचा बनला असल्याने पावसाळ्यात मात्र ईथ कसरत करावी लागत असल्यामुळे येथील जनतेला अनेक संकटाला सामोरे जावे लागत असल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे जवळगावकर जन्मभुमी तसेच कर्मभूमी आसलेले स्थानिक आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब या कडे दुर्लक्ष करत असल्याचे जनतेतून ऐकण्यास मिळत आहे पारवा खुर्द येथील मतदार प्रचंड प्रमाणात आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना मतदान करताना दिसतात पण या गावात सर्वात जास्त मताधिक्य मिळुन सुध्दा या ठिकाणचा विकास होत नसल्याने शेतकरी. शेतमजुर यांना याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे आ. जवळगावकर साहेब यांनी तातडीने या रस्त्याकडे लक्ष द्यावे व पांदण रस्ता हा मोकळा करून द्यावा अन्यथा लोकशाही उपोषणाला बसणार आसल्याचे पारवा येथील गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.