Home Breaking News *भोकर मध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन..*

*भोकर मध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन..*

👉नामांकित कंपनीत लागणार नौकरी..नामदेवराव आयलवाड

प्रतिनिधी/ माधव काईतवाड बोरगडीकर

भारतीय यादव महासभा कार्याध्यक्ष व गोल्ला – गोल्लेवार यादव समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा ओबीसी नेते,समाज भुषण, समाजातील असलेले प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र निस्वार्थ पणे समाजासाठी कार्य करणारे व्यक्तीमत्व म्हणजे          नामदेवराव आयलवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि.7-7-2023 रोजी
सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून महा रोजगार मेळावा घेण्याचे काम नामदेवराव आयलवाड साहेब यांच्या वतीने हाती घेण्यात आले असून ७ जुलै रोजी हा मेळावा भोकर येथे संगम फक्शन हॉल रेल्वे स्टेशन रोड येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शिक्षण घेऊन देखील नोकऱ्या लागण्याचे प्रमाण फार कमी झाल्याने सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, एमसीव्हीसी कोर्स केलेल, डिप्लोमा, बीई इंजीनियरिंग, बीए, बी. कॉम, पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नामांकित कंपन्यांची हजेरी या ठिकाणी राहणार आहे. भोकर तालुका व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळावी म्हणून नामदेवराव आयलवाड साहेब यांच्या वतीने भोकर येथे ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संगम फंक्शन हॉल रेल्वे स्टेशन रोड भोकर येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला असून पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, आयटीआय ट्रेड केलेले, एमसीव्हीसी कोर्स झालेले, डिप्लोमाधारक, इंजिनिअरिंग, बी. ए., बी. कॉम पदवीधर व इतर विद्यार्थ्यासाठी नामांकित कंपन्या मुलाखत घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट, चार फोटो, मूळ प्रत व झेरॉक्स प्रति प्रत्येकी दोन प्रत सोबत घेऊन यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous articleधनगर समाजाच्या सुरेखा बिडगर पीएसआय परिक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम
Next articleजवळगाव पारवा (खुर्द) ते पोटा जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था…..