Home Breaking News वडगाव फिडरच्या वीजपुरवठा कर्मचारी यांचा मनमानी कारभार

वडगाव फिडरच्या वीजपुरवठा कर्मचारी यांचा मनमानी कारभार

वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा लोकशाही मार्गाने अंदोलन करण्यात येईल….. डॉ. अब्दुल गफार कार्लेकर ( तंटामुक्ती ता. अध्यक्ष)

अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी

हिमायतनगर तालुक्यातील कारला ,पिचोंडी,शिबदरा,धानोरा, वडगाव, बोरगडी, वारंग टाकळी, मंगरुळ आशी अनेक गावे येतात, परंतू वारंवार मागणी करून सुद्धा या फिडर वरील अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा मुळे, साधारण वारे सुटले किंवा पाच मिनीट पाणी जरी पडले तरी वडगाव येथील फिडर चालक विज नादुरूस्त म्हणून रात्रभर दहा ते पंधरा-पंधरा तास विज बंद ठेवत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या आढमुठी कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराचा येथील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत होत आहे लाईट गेल्याने एखाद्या व्यक्तीनेफिडर वरिल कर्मचारी किंवा लाईनमन यांच्याशी संपर्क केल्यास ते उडवाउडवीची उत्तर देऊन सर्वसामान्य नागरिकांना आरेराई करत असल्याचे लोकांनी सांगितले आहे वीज पुरवठा सुरळीत नाही केल्यास लोकशाही मार्गाने अंदोलन करण्याचा इशारा देऊन महावितरण विभागाचे ग्रामीण भागाचे इंजिनिअर कळस करून साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली यावेळी..डॉ. गफार कार्लेकर तंटामुक्त तालुका अध्यक्ष दिली आहे.
गजानन कदम (सरपंच) सोपानराव बोंपीलवार पत्रकार, परमेश्वर पाटील (माजी चेअरमन) रामेश्वर यमजलवाड (माजी सरपंच) रजाक शेठ, दत्ता चिंतलवाड (ग्रा.प.स.) सौ. संगीताबाई मिराशे, श्रीराम मुठ्ठेवाड, मधुकर घोडगे, तुकाराम कदम, पवन ताटेवाड, नागेश रासमवाड,कृष्णा मिराशे, भगवान कांबळे, सयाजी ढाणके, जांबुवंतराव मिराशे, आनंदराव सुर्यवंशी, आदी अनेक सह्या आहेत.

Previous article“समान नागरी कायदा समज-गैरसमज!”
Next articleधनगर समाजाच्या सुरेखा बिडगर पीएसआय परिक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम