मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 1 जुलै 2023
पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर येथे हरीत क्रांतीचे जनक, महाराष्ट्र राज्याचे स्व. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती येथे वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कृषि दिनानिमित्त कार्यक्रमात, नाईक साहेबांच्या जिवनावर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत मांडले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे पहिले मुख्यमंत्री होते. तसेच शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी तन, मनाने कामे केली आहेत. आजपर्यंतचा ज्यांचा विश्वविक्रम आहे असे, दिवंगत मा.मुख्खमंत्री स्व.
वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त व कृषी* दिनानिमित्त भाजपचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांनी आपले मनोगत मांडले आहे.
पंचायत समिती हिमायतनगर येथे तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती यांचा संयुक्तपणे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी…
कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ यांनी उपस्थित जनसमुदाया शेतीविषयक अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी कृषिविषयक योजनेचा लेखाजोखा मांडताना म्हणाले, शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजना लाभ घ्यावा. असेही ते म्हणाले. यावेळी कृषि विस्तार अधिकारी देशमुख, कृषि अधिकारी मारोतराव काळे, मा.पंचायत समिती सदस्य बालाजी राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान, विजय वळसे, कृ. उ.बा. चे सभापती जनार्दन ताडेवाड, सामाजिक कार्यकर्ते दिलीप राठोड, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी संदीप पाटील वानखेडे, बंजारा टायगर फोर्स ता.अध्यक्ष दिनेश राठोड, कृषि असोसिएशनचे अध्यक्ष रमेश अप्पा पळशिकर, कृषि सेवा केंद्राचे सर्व संचालक, ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक, सरपंच पवन करेवाड सरपंच गौतम दवणे, सरपंच कानबा पोपुलवाड, कृषी पर्यवेक्षक वानखेडे, कृषि सहाय्यक माने, कृषि सहाय्यक कोटुलवार, बेहेरे-ढगे मॅडम, कृषि सहाय्यक लोसरवार, कृषि सहाय्यक माझळकर, पत्रकार विजय वाठोरे, राजू गायकवाड, खउम दादा, कृष्णा राठोड सर्व पत्रकार बांधव, कृषी कार्यालय व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, हिमायतनगर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.