Home Breaking News नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन.

नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 2 जुलै 2023

पेरकी व पेरकेवार समाजाचे भूषण नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष एक लढवय्या नेता आदरणीय कै. बाबारावजी एंबडवार साहेब यांचे सोलापूर येथे आपघाती निधन झाले आहे. आदरणीय साहेब पेरकी, पेरकेवार समाजाची मराठवाड्यातील नव्हे महाराष्ट्राची शान होती. त्याच्या जान्याने पेरकी पेरकेवार समाज हा पोरका झाला आहे. साहेब आपल्या रुपाने पेरकेवार समाजाला एक खंबीर नेतृत्व करणारा, निर्भीड आणि अभ्यासू राजकीय चेहरा मिळाला होता. व महाराष्ट्रातील हा अल्पसंख्याक असलेला पेरकी, पेरकेवाड समाजाची ओळख आपल्यामुळेच होऊ लागली होती. साहेब आपल्या जान्याने आमच्या सारखे सर्व सामान्य माणसं आपल्या आदर्शावरच समाजाची ओळख करून देत होते. कधीन न भरुन निघणारी ही पोकळी आहे. समाजासाठी आपल्या आपघाती निधनाने झाली आहे. येणाऱ्या काळात समाजाला दिशा दाखवणारा नेताच हरपला आहे. आणि समाज एक आपल्या रुपाने पोरका झाला आहे.साहेब आपल्या आत्म्यास ईश्वर शांती देवो व एंबडवार परीवारावर आलेला हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तमाम मराठवाडा , विदर्भ, महाराष्ट्र राज्यातील पेरकी, पेरकेवाड समाज बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

Previous article💐 *सगुण* 💐
Next articleहरित क्रांतीचे प्रणेते स्व. मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन उत्साहात साजरा.