👉 सरकारचे आभार! भागवत देवसरकर यांची माहिती.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 25 जुन 2023
महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या वतीने राज्यातील
तलाठी संवर्गातील ४६४४ रिक्त असलेली पदे भरण्यासाठी, महसूल व वन विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशी माहिती भागवत देवसरकर सदस्य-कार्यकारी परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी दिली आहे.
या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासुन म्हणजेच २६ जून 2023 पासून सुरु होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांनंतर तलाठी पदांची जाहिरात निघावी यासाठी भागवत देवसरकर यांनी अनेकवेळा मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठपुरावा केला होता,
चांगल्या पदसंख्येची निर्मिती करून, जाहिरात प्रसारित केल्याबद्दल मुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंद , उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व महसूलमंत्री मा. राधाकृष्णजी विखे पाटील यांचे मनस्वी आभार मानले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्या प्रकारच्या नोकरी भरतीची प्रक्रिया रखडल्या होत्या, भाजप – शिवसेना सरकारमुळे पोलीस भरती नंतर रखडलेली तलाठी भरती प्रक्रियाही सुरु झाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे, यामुळे महाराष्ट्रातील हजारो युवकांना नोकरी मिळणार आहे. असेही बोलतांना आमच्या प्रतिनिधीना सांगितले.