Home Breaking News कृषि सहाय्यक नसल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनचा अभाव.

कृषि सहाय्यक नसल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनचा अभाव.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 25 जुन 2023

हिमायतनगर तालुक्यातील सज्जा कार्ला ज. येथील कृषि सहाय्यक गेल्या काही महिन्यांपासून गायब असल्याने, ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती उपलब्ध होत नाही. महाराष्ट्र शासन कृषि विभागांतर्गत कृषि बाबी विषयी अनेक योजना राबविल्या जात आहेत. तालुका कृषी अधिकारी हेही अभ्यासु, शांत आणि संयमी असल्याने, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. हेही सत्य नाकारता येणार नाही. एकंदरीत सर्वच स्टाफ चांगला आहे. त्यामुळे कृषि विषयक विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी होत आहे. परंतु कार्ला येथील कृषि सहाय्यक सतत गैरहजर राहत आहेत. खरीपाच्या तोंडावर कार्ला येथील शेतकऱ्यांना कृषीविषयक खते, बियाणे, पंतप्रधान किसान सन्मान निधी, आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण, ” शासन आपल्या दारी” फळबाग लागवड, यांत्रिकीकरण अशा अनेक योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामस्तरावर कृषि सहाय्यक हा महत्त्वाची भुमिका पार पाडतो. लवकर कार्ला गावाला कृषि सहाय्यक द्यावा. अशी मागणी संरपंच गजानन कदम, सोपान बोंमपिलवार पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य, कृषि मित्र अंगद सुरोशे, चेअरमण नाथा गंगाराम चव्हाण पाटील, लुम्दे पाटील बंधु आदी शेतकरी बांधवांनी केली आहे.

Previous articleपाचवी, आठवी परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्यच, ढकलपासला चाप
Next articleतालुका प्रशासनाच्या वतीने “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमास शेतकरी रवाना.